पोस्ट्स

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान

इमेज
  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी मुंबईत धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान होणार आहे.            बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)नवगण राजुरीकर   यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 13-02-2024 रोजी मुख्यमंत्री श्रीएकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार व  सुधीर मुनगंटीवार  (सांस्कृतिक कार्य मंत्रालय) यांच्या हस्ते दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अमृत आश्रम स्वामी महाराज यांचा यास समारंभात गौर...

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

इमेज
  ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        शहरातील एका ज्युस सेंटरमध्ये आलेल्या  ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त झाले.या ज्युस सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका युवकाने या मुलींचा व्हिडिओ फोटो घेण्याचे हे ग्रहणास्पद हे कृत्य केल्याने मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.दरम्यान मध्यवर्ती ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाली होती.        प्राप्त माहितीनुसार, परळीतील उपजिल्हा रुग्णालयाजवळ मुख्य रस्त्यावरच असलेल्या लोकमान्य ज्युस सेंटरमध्ये दोन युवती बसलेल्या असताना याच ज्युस सेंटरमध्ये काम करणारा एक युवक वारंवार त्यांच्या टेबलजवळून मोबाईल हातात धरुन ये-जा करत होता. ही बाब एका मुलीच्या लक्षात आल्याने तिने आपल्या पालकांना ही बाब कळवली.पालकांनी  येउन शहानिशा केली असता  या ज्यूस सेंटर मध्ये काम करणाऱ्य  मुलाने या   युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट केल्याचा प्रका...

स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम

इमेज
  महाराष्ट्र विद्यालयाचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम परळी / प्रतिनिधी ग्रामीण भागातील उपक्रमशील, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) घवघवीत यश संपादन करत शाळेतील 4 विद्यार्थी या परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये पार पडली. या परीक्षेत विद्यालयातील एकोणतीस विद्यार्थी सहभागी झालेले होते या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यालयातील 4 विद्यार्थी उत्तीर्ण होत शिष्यवृत्ती करिता पात्र झाले आहेत. ही परीक्षा भारत सरकार तर्फे आयोजित केली जाते. या परीक्षेत जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतात त्यांना वर्षाला बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात 60 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील कु.अमृता दत्ता शिंदे, चि.सलगर वरद बाबुराव, चि.विश्वजित दत...

राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

इमेज
  कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते-संचालक मोहिनी केळकर लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ दिले- कल्याण आयुक्त रविराज इळवे परळी (प्रतिनिधी) :  कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते, कामावर ताणतणाव कमी होण्यास मदत होते असे प्रतिपादन ग्राईंड मास्टर टुल्सच्या संचालक मोहिनी केळकर यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी तापडिया नाट्यमंदिर येथे झाले. यावेळी मोहिनी केळकर बोलत होत्या. व्यासपीठावर अतिरिक्त संचालक मानव संसाधन, लोकमत वृत्त समुहचे बालाजी मुळे, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांची उपस्थित होती. जुन्या पिढीची कला परंपरा जपण्याचे काम कामगार  मंडळ करत आहे. संगित, नृत्यामुळे वजन नियंत्रणात राहून आरोग्य उत्तम राहते असे यावेळी लोकमत वृत्त समूहाचे अतिरिक्त संचालक बाळाजी मुळे म्हणाले. लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे. कामगार कल्याण मंडळामुळे अनेक कलावंत, खेळाडू घडले आहे अ...

बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

इमेज
  बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते  होणार उद्घाटन परळी: प्रतिनिधी   बीड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार असून परळी तालुक्याचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे सतत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवत असतात आणि दिव्यांगासाठी घेतलेला सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा वसा ते अविरत जपत असतात.   त्यांच्याच प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून बीड जिल्ह्यातील ह्या पहिल्या दिव्यांगाच्या मराठवाडा  शिवभोजन केंद्राचे बरकत नगर परळी वैजनाथ येथे भव्य शुभारंभ आज होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.    अशा या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून परळी तालुक्यातील सामान्य आणि गरजू नागरिकांना तसेच दिव्यांगाना अतिशय पोषक व सकस आहार उपलब्ध करून देण्याचे पुण्य का...

क्रिकेट क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करणार - पार्थ हिबाने

इमेज
  शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अंबाजोगाई च्या पार्थ हिबाने याची निवड;पार्थची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब - प्रदीप खाडे अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-      शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अंबाजोगाई येथील पार्थ संजय हिबाने  याची 14 वर्षाखालील गटामधून निवड झाली आहे. पार्थ याची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा कै.रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले. पार्थची निवड झाल्याबद्दल प्रदीप खाडे यांच्या निवासस्थानी आज कौटुंबिक सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.      क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय सोलापूर व शिवरत्न स्कूल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ते 5 जानेवारी अकलूज येथे निवड शिबिर घेण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून पार्थ संजय हिबाने निवड झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागातून 57 विद्यार्थी येथे खेळण्यासाठी आले होते. छत्रपती संभाजी नगर विभागातून  पाच खेळाडू या शिबिरात सहभागी झाले होते. त्याम...

राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी

इमेज
  राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी       राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवाव्यात, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे शाळांना आता चौथी पर्यंतच्या वर्गाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात मुलांच्या शाळेची वेळ प्राथमिक शाळा वर्ग सकाळी आणि माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरवले जातात.  महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. या गटात 3 ते 10 वर्षांचे मुले असतात. या मुलांच्या सकाळी शाळा असंल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या साठी या मुलांच्या शाळेच्या वेळ बदलण्याच्या सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून केल्या जात होत्या. प्राथमिक वर्गच्या शाळा दुपारी आणि माध्यमिक वर्गांच्या शाळा सकाळी व्हावा.या बाबत राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली. आता प्राथमिक शाळांचे वर्ग  शाळांची व...