पोस्ट्स

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
दुःखद वार्ता:  संतोष फड यांचे निधन परळी (प्रतिनिधी):- शहरातील कपड्याचे व्यापारी व कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले संतोष गणपतराव फड वय (35) वर्ष यांचे दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वा. हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.  त्यांच्या या निधनामुळे  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ,  दोन मुली व मोठा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राख सावडण्याचा विधी आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता राख सावडण्याचा विधी कनेरवाडी येथील स्मशानभूमीत होणार आहे. फड परिवारावर कोसळलेल्या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण.....

इमेज
  औरंगाबाद -हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस उशिरा सुटणार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... बदनापूर करमाड दरम्यान आठवड्यातून दोन दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे, यामुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून उशिरा सुटणार आहे.      गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस औरंगाबाद येथून दिनांक 17, 20, 24 आणि 27 फेब्रुवारी, तसेच दिनांक 2, 5 आणि 9 मार्च, 2024 रोजी तिची नियमित वेळ दुपारी 16.15 वाजता सुटण्या ऐवजी दोन तास उशिरा म्हणजे सायंकाळी 18.15 वाजता सुटेल.प्रवाशांनी  याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.        

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

इमेज
 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर :राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम विजयकुमार यादव, डॉ. प्रदीप महाजन, धर्मवीर भारती, राणा सूर्यवंशी, राहुल पापळ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश मुंबई (प्रतिनिधी) :  राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत, पत्रकार हितासाठी आग्रही असणाऱ्या पाच व्यक्तींना महाराष्ट्र राज्य सरकार, व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार  देण्यात येत आहेत. समाजसेवा, पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींबाबत राज्यातून नागरिक, पत्रकारांकडून ३५२ प्रस्ताव आले होते. ज्यातून पाच व्यक्तींची निवड करण्यात आली, अशी माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांनी आज दिली. ज्येष्ठ समाजसेवक पोपटराव पवार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, इतिहास तज्ज्ञ डॉ. शिवरत्न शेटे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील हे पाच जण निवड समितीमध्ये होते. विजयकुमार यादव प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक. धर्मवीर भारती प्रसिद्ध अभियंता, सामाजिक कार्यकर्ते. डॉ. प्रदीप महाजन विच...

डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरा

इमेज
  खा.डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरा वंचित, शोषित, निराधार व दिव्यांगांसाठी सुरू केलेला सेवा यज्ञ अहोरात्र सुरू राहण्यासाठी प्रितमताई यांना दिर्घ आयुष्य लाभो -राजेश गित्ते  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे बेलंबा तालुका परळी वैजनाथ येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना वैधनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली की प्रत्येकी वर्षी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशानुसार सेवा भाव ठेवून वाढदिवस साजरा करण्यात येतो.या ही वर्षी आपण बेलंबा येथे हा कार्यक्रम घेत आहोत.लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध साम...

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर देणार

इमेज
  बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा होणार-राजेश गित्ते  जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर देणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रति वर्षी प्रमाणे या ही वर्षी विविध सामाजिक उपक्रम आणि जागृत देवस्थान येथे अभिषेक करून प्रितमताई मुंडे यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.     परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे बेलंबा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वाटर फिल्टर बसवण्यात येणार आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील  जागृत देवस्थान केदारेश्वर (वैजवाडी), काळभैरवनाथ (मांडवा), दत्तगुरु (दादाहारी वडगांव)बेलेश्वर भगवान (बेलंबा) मंदिरात अभिषेक व पुजा करुन प्रितमताई मुंडे यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.   ...

जिनिंगला आग;१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक

इमेज
  जिनिंगला आग;१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक माजलगाव शहरा जवळ आसलेल्या फुले पिंपळगाव येथील कुणाल कापुस जिनिंगला मशिन मध्ये फायर झाल्याने लागलेल्या आगीत१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना दुपारी ४वाजता  आग आटोक्यात आण्यास केवळ माजलगाव च्या अग्निशमन शिवाय कुठलीही मदत मिळाली नसल्याने आग आटोक्यात आनन्यास अपयश आले      माजलगाव शहरा जवळ असलेल्या पिंपळगाव शिवारात प्रवीण अग्रवाल यांच्या कुणाल कापूस जिनिंगला दि.१६ रोजी दुपारी चार वाजता मशीन मध्ये झालेल्या स्पार्कने फायर होऊन जिनिंग मध्ये असलेल्या कापसाला आग लागली. या आगीने खूप मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केल्याने जिनिंग मध्ये असलेला जवळपास 15000 कुंटल कापूस जळून खाक झाला यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली.   ही आग आटोक्यात आणण्यासाठी जिनिंगमध्ये असलेल्या वाटर सप्लायने आग आटोक्यात आणण्यासाठी. त्यासाठी माजलगाव नगरपरिषदेच्या अग्निशामन दलाच्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात असताना एका गाडीलाही आगवी देण्यात आदेश आले तोपर्यंत जुनी मधील सर्व कापसाला आग...

◆माकपची परळी तहसील कार्यालय समोर जोरदार निदर्शने

इमेज
 ◆ माकपची परळी तहसील कार्यालय समोर जोरदार निदर्शने परळी/प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी एमएसपी चा कायदा लागु करावा व आशा व गटप्रवर्तांकांना जाहीर केलेला मानधन वाढीचा जीआर लागु करावा या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी तहसील कार्यालया समोर शुक्रवारी (ता.१६) तीव्र निदर्शने करण्यात आली.             किसान मोर्चाच्या वतीने दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रामीण भारत बंद व संपाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता.१६) माकप च्या वतीने परळी तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना सर्वसमावेशक उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा मिळुन किमान आधारभूत किंमतीचे (एमएसपी) देण्याचे दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पुर्ण करावे, आशा व गटप्रवर्तांकांच्या वाढीव मानधनाचा जी आर काढुन तात्काळ अंमलबजावणी करावी, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा उपकार्यालय परळीत सुरू करावे, दलीत आदिवासी यासारखे उपेक्षित समुदाय आणि महिला शेतकऱ्यांच्या जमिनींच्या...