पोस्ट्स

पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे सहभागी: पालखीही वाहिली

इमेज
महाशिवराञ: जिरेवाडीच्या प्रभु सोमेश्वराचा पालखी सोहळा वैद्यनाथाच्या भेटीला! पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे सहभागी: पालखीही वाहिली परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        परळी वैजनाथ तालुक्यातील  जिरेवाडी येथील जागृत देवस्थान भगवान श्री सोमेश्वराचा पालखी सोहळा  मोठ्या ऊत्साहाने प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला आला.या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. अनेक वर्षापासुनची परंपरा असलेला हा पालखी सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात  निघाला.         या पालखी सोहळ्यात भजनी मंडळी, कलशधारी महीला, शाळकरी मुलांचे टिपरी, आणि लेझीमपथक यांसह गांवकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सकाळी  सोमेश्वर मंदीर जिरेवाडी येथुन पालखीचे प्रस्थान होउन हा पालखी सोहळा जलालपुर  - शिवाजी चौक - एकमिनार चौक -    स्टेशनरोड -बाजार समिती - टॉवर - जगमिञ नागा मंदीर मार्गे वैद्यनाथ मंदीर येथे दुपारी पोहोचला.ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.  दरम्यान मा...

अंबाजोगाई नंतर गेवराईतही भगरीतून विषबाधा झाल्याची घटना :अनेकांची प्रकृती बिघडली

इमेज
  अंबाजोगाई नंतर गेवराईतही भगरीतून विषबाधा झाल्याची घटना :अनेकांची प्रकृती बिघडली गेवराई....          एकादशीच्या दिवशी दि.7मार्च फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने शहरातील काही भागात अनेकांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या बाधितांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.        प्राथमिक माहितीनुसार, बाधित 3 च्या आसपास आहेत.  एकादशी असल्याने भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.दिवसेंदिवस होत असलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

सकाळी नऊ वाजता मुंबईत सुरू झालेला दिवस, मध्यरात्री नंतरही काम सुरूच

इमेज
  अन् धनंजय मुंडे पोचले मध्यरात्री दवाखान्यात! अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांच्या भेटीला मध्यरात्रीत पोहोचले मुंडे सकाळी नऊ वाजता मुंबईत सुरू झालेला दिवस, मध्यरात्री नंतरही काम सुरूच! अंबाजोगाई (दि.12) - मुंबईवरून आपले दिवसभराचे कामकाज आटोपून छत्रपती संभाजी नगर मार्गे बीड वरून महाशिवरात्री साठी परळी कडे निघालेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात येऊन पोहोचले.  परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असल्याबाबतचे वृत्त समजतात धनंजय मुंडे यांनी आपला परळीच्या दिशेने निघालेला ताफा थेट अंबाजोगाई कडे वळवत, स्वाराती मध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या चौकशीसाठी मध्यरात्री येऊन भेट देत विचारपूस केली.  राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिवस आज सकाळी नऊच्या सुमारास सुरू झाला होता. दिवसभर विविध शासकीय कामकाज, बीड रेल...

आज दैठणा येथे होणार अंत्यसंस्कार

इमेज
  दैठणा घाटचे सरपंच अशोक दादाराव गुट्टे यांचे  निधन आज दैठणा येथे होणार अंत्यसंस्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे दैठणा या गावचे सरपंच अशोक दादाराव गुट्टे यांचे हृदय विकाराने आज गुरूवारी ( दि. 7/3/2024 रोजी पुणे येथील एका खाजगी रुगणालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 65 वर्षाचे होते.       दैठणा या गावचे तब्बल 15 वर्ष सरपंच राहिलेले अशोक गुट्टे आजारी असल्याने त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच  त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभाव असल्याने ते संपूर्ण परळी/अंबेजोगाई तालुक्यामध्ये सुपरीचीत होते. धार्मिक वृत्तीचे आणि राजकारण, समाजकारणामध्ये सक्रिय असल्याने त्यांचा तालुक्यामध्ये दांडगा संपर्क होता. अशोक गुट्टे हे संपूर्ण तालुक्यात सरपंच या नावाने ओळखले जात असत. त्यांच्या निधनाने दैठणा गाव आणि परीसरात  मध्ये शोककळा पसरली आहे. कै. अशोक गुट्टे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ, पाच बहिणी, सुना-नातवंडे असा भरगच्च परिवार आहे....

ज्येष्ठ नागरिकांना मुद्दत संपलेल्या ठेवी एक रक्कमी द्या- अनिल बोर्डे

इमेज
  ज्येष्ठ नागरिकांना मुद्दत संपलेल्या ठेवी एक रक्कमी द्या- अनिल बोर्डे                   गेवराई:- ज्येष्ठ नागरिकांनी गेवराई शहरातील सर्व मल्टीस्टेट व पतसंस्था यामध्ये भवितव्यासाठी गुंतवणूक केलेली आहे सदरील मुदत संपल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना एक रक्कमी रक्कम मिळावी यासाठी गेवराई तहसील कार्यालय येथील श्री संजय जी सोनवणे नायब तहसीलदार गेवराई यांच्याकडे याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन प्रमुख अनिल बोर्डे यांनी केलेली आहे त्याची प्रत माननीय जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आली आहे.                      गेवराई शहरांमध्ये मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी व पतसंस्था यांच्याकडे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केलेली आहे परंतु मुद्दत ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मल्टी स्टेट करून न देता ठराविक रक्कम दिली जाते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ही बाब गंभीर आहे व त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही याप्रकरणी लक...

महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

इमेज
  महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन       पाटोदा /प्रतिनिधी              पाटोदा शहराचे ग्रामदैवत श्री भामेश्र्वर  मंदिर येथे आज दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 9 ते 11 महाशिवरात्री व संताजी महाराज पुण्यतिथी  निमित्ताने महंत ह.भ.प . राधाताई महाराज सानप ( श्री आईसाहेब देवस्थान महासांगवी) यांचे अमृततुल्य कीर्तन होणार आहे.       गेल्या 26 वर्षापासून दरवर्षी भामेश्वराची सेवा म्हणून राधाताई न चुकता महाशिवरात्रीला भामेश्र्वर  मंदिर येथे  कीर्तन सेवा करत आहेत . तसेच रात्री ठीक बारा वाजता ब्रह्मवृंदाच्या वतीने भामेश्र्वराची महापूजा होईल . दोन मार्च पासून भक्ती दीदी आळंदी यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा सुरू आज शुक्रवारी कथेची सांगता आहे .  शनिवारी 9 मार्च  रोजी सकाळी 9 ते 11 संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भामेश्र्वर मंदिर पर्यंत  संताजी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर 11ते 1 ह.भ प.भक्ती दीदी आळंदी यांचे काल्याचे कीर्तन व त्...

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने

इमेज
  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त परळीत प्रथमच बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शन परळी वैजनाथ/प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 6  ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रथमच बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शनाचा लाभ घेता येणार असून या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. परळी शहरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मंदिर असून महाशिवरात्रीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचवटीनगर, जुने पावर हाऊसच्या समोर, वैद्यनाथ मंदिर रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत बर्फाचे शिवलिंग  अमरनाथजींचे दर्शन भाविक भक्तांना घेता येणार आहे.  दरम्यान सकाळी 8 व सायंकाळी 7 वाजता आरती होणार आहे. या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी म...