पोस्ट्स

संभाजीनगर परळी वै. पोलीसांची कार्यवाही

इमेज
  देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त ! संभाजीनगर परळी वै. पोलीसांची कार्यवाही परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळीतून एका जणाकडून देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. संभाजीनगर परळी वै. पोलीसांनी आज ही  कार्यवाही केली आहे.         संभाजीनगर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डुणपुला खाली थांबला असुन त्यांचे जवळ गावठी कट्टा आहे . पोलीस स्टाफ व दोन पंचासह रवाना होवुन सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डाणपुला खाली शिदी खाण्याचे समोर मिळून आला पंचा समक्ष त्याची अंग इ ाडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजुस पॅन्टंमध्ये खोवलेला एक सिल्वर रंगाचा स्टेनलेस स्टीलचा गवठी बनावटीचा मॅगझीनसह कटटा (पिस्टल), ज्यास पकडण्यासाठी स्टीलची मुठ व त्यावर ग्रीप करीता चॉकलेटी रंगाचे प्लास्टीक कव्हर असलेला असा जुना वापरता कि.अ.40,000/- रुपये व मॅगझीन मध्ये दोन जिवंत काढतुस 1000/- रुपये असे गावठी कटटा व काढतुस दोन्हीची एकुण किमंत 42,000/- रुपयेचा मुदेमालासह मिळुण ...

एसटी करणार महायुतीचा प्रचार !

इमेज
  एसटी करणार महायुतीचा प्रचार !        लोकसभा निवडणुकीची  रणधुमाळी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून  एसटी बसवर लावण्यात आलेल्या सर्व राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र एस टी महामंडळाने एक पत्र काढले असून या पत्रानुसार आता महायुतीच्या प्रचाराच्या जाहिराती लावण्यास परवानगी देण्यात येत असल्पाचे सर्व विभागीय नियंत्रकांना कळविण्यात आले आहे.त्यामुळे एसटी आता महापयुतीचा प्रचार करणार आहे.       एस टि महामंडळाचे महाव्यवस्थापक (नियोजन व पणन)  यांचे एक पत्र जारी करण्यात आले असुन या पत्रानुसार आता एसटीवर महायुतीच्या जाहिरातीला परवानगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियंत्रक रा.प. मुंबई / पालघर / रायगड (पेण) रत्नागिरी / सिंधुदूर्ग / ठाणे / नाशिक / धुळे / जळगांव / अहमदनगर / पुणे / कोल्हापूर / सांगली / सातारा / सोलापूर / औरंगाबाद / बीड / जालना / लातूर / नांदेड / उस्मानाबाद / परभणी / नागपूर / भंडारा / चंदपूर / वर्धा अकोला / अमरावती / यवतमाळ / बुलडाणा / गडचिरोली विभाग, या विभागांना ...

रेल्वे स्थानकातील तांत्रिक विभागाचे कर्मचारी कुठे होते?

इमेज
  परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी ;काही काळ एकच तारांबळ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळी वैजनाथ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये अचानक काहीतरी बिघाड झाल्याने ही लिफ्ट मध्येच अडकली. या लिफ्टमध्ये काही प्रवासी अडकून बसले. चालू लिफ्ट अचानकच बंद पडून अडकल्याने या लिफ्ट मधील प्रवाशांची तारांबळ उडाली.        परळी रेल्वे स्थानकावर आज रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर अकोला गाडी ला जाण्यासाठी काही प्रवासी लिफ्ट मधून वर जात असताना या लिफ्टला तांत्रिक बिघाड झाला. लिफ्ट सुरू झाल्यानंतर मध्येच अडकून बसली. त्यामुळे बराच वेळ या लिफ्टमध्ये प्रवाशी अडकले. लिफ्टमध्ये असलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची तारांबळ प्लॅटफॉर्म वरील नागरिकांच्या लक्षात आली आणि नागरिकांनी  सतर्कता दाखवत ही लिफ्ट खाली घेतली व लिफ्टमध्ये अडकलेले प्रवासी त्यानंतर सुखरूप  बाहेर पडले.       ...

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  आध्यत्मिक गुरु वासुदेवराव खंदारे गुरुजी यांचे निधन ; नव्वदव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  केज  : रामकृष्ण परमहंस अनुयायी परिवाराचे अध्यात्मिक गुरू प. पू. वासुदेवराव खंदारे गुरुजी { 90 वर्ष } यांचे  सोमवार रोजी दुपारी चारच्या सुमारास लातूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आज (मंगळवारी) सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.        खंदारे गुरुजी नावानेच परिचित असलेले वासुदेवराव बंडोपंत खंदारे हे मूळ वरपगाव  येथील परंतु अनेक वर्षांपासून ते केज येथेच वास्तव्यास होते . विनोबा भावे यांच्या विचारांचा पगडा असलेल्या खंदारे गुरुजींनी ध्यान व प्राणायामाच्या माध्यमातून हजारो तरुणांना अध्यात्माच्या मार्गावर आणले व निर्व्यसनी जगण्याचा मंत्रही दिला  मागील काही दिवसांपासून ते आजारी होते लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना काल दि 15 रोजी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले            त्यांच्यावर आज धारूर रोड याठिकाणी असलेल्या गो शाळेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चा...

लोकसभेचा उमेदवारी अर्ज कसा भरावा ?

इमेज
नामनिर्देशन पत्र अर्ज सजगतेसह नियमानुसार परिपूर्ण भरा : जिल्हादंडाधिकारी बीड, दि. 15(जिमाला): लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू असून 39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे हे नामनिर्देशन अर्ज उमेदवाराने सजगतेने तसेच परिपूर्ण भरावे अशा सूचना, जिल्हादंडाधिकारी आणि  दीपा मुधोळ मुंडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले.  आज नियोजन सभागृहात सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीदरम्यान जिल्हादंडाधिकारी यांनी सूचना केल्या.  याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे उपस्थित होते. जिल्हा निर्णय निवडणूक अधिकारी पुढे म्हणाल्या, 18 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. याच दिवसापासून  11 ते 3 पर्यंत दिनांक 25 एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी 12.500 हजार रुपय...

पुरातन गोराराम मंदीर परळी येथे रामनवमी निमित्त रामजन्मोत्सवाचे आयोजन

इमेज
  पुरातन गोराराम मंदीर परळी येथे रामनवमी निमित्त  रामजन्मोत्सवाचे आयोजन आयोध्येतील रामलल्ला स्थापनेनंतरचा पहीला जन्मोत्सव:राम भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावाः- रामदासदादा रामदासी परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         परळीतील पुरातन अशा श्री गोराराम मंदीर येथे अयोध्येच्या रामलल्ला स्थापने नंतरचा पहीला रामजन्मोत्सव दि.१७ रोजी बुधवारी मोठया उत्साहात संपन्न होणार आहे. प्रभु रामाच्या दर्शनाचा व दुपारी १२ वाजता होणा-या जन्मोत्सवाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे वैद्यराज रामदासदादा रामदासी यांनी आवाहन केले आहे.             परळीतील ४०० वर्षे पुरातन असे गोराराम मंदीर असुन समर्थ रामदास स्वामी सज्जनगड यांचे शुभ हस्ते स्थापन केलेला मारोती व त्यांचे पट्टयशिष्य कल्याण स्वामीच्या हस्ते अयोध्या येथुन त्या काळी आणलेल्या श्रीराम मुर्ती स्थापन केलेल्या आहेत. अयोध्या येथे रामलल्ला स्थापना झाल्या नंतरची ही पहीली रामनवमी असुन रामकथाकार पं.मनोहरदेव जोशी कानेगांवकर यांनी अध्यात्म रामायण नऊ दिवस सांगीतले आहे. शेकडो वर्षाची परंपरा आजची पिढी पुढे चालवीत आहे...

परळी उपजिल्हा रुग्णालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

इमेज
  परळी उपजिल्हा रुग्णालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  परळी प्रतिनिधी.      महामानव ,विश्वरत्न , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133  व्या जयंतीनिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पत्रकार विकास वाघमारे यांच्या हस्ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.       14 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय परळी वै येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विकास वाघमारे (दैनिक महाभारत )यांचे हस्ते पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली .यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे ,वैद्यकीय अधिकारी, डॉ सचिन निळे ,डॉ राजश्री गीते, सहाय्यक अधीक्षक रामधन कराड ,औषध निर्माण अधिकारी दिक्कतवार, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी गीताजी चव्हाण, परी सेविका श्रीमती ज्योती कुलकर्णी, शीला कुलकर्णी, जगतकर ,शिंदे ,नागोराव वाळले ,सोमनाथ गिरी इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.