पोस्ट्स

समाजाचे हित लक्षात घेऊनच ज्योतीताईंचा निर्णय -कैलास नाईकवाडे पाटील

इमेज
  समाजाचे हित लक्षात घेऊनच ज्योतीताईंचा निर्णय - कैलास नाईकवाडे पाटील परळी वैजनाथ, प्रतिनिधी           समाजाचे सर्व व्यापक हित लक्षात घेऊनच डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी निर्णय घेतला असून हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाचे समाजातून स्वागत होत असून या निर्णयाने समाजाचे सर्व व्यापक हित साधले जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम तालुकाध्यक्ष कैलास नाईकवाडे पाटील यांनी दिली आहे.          बीड लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी निवडणूक आहे. शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांनी आपण बीड लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांची भेट ही घेतली होती. परंतु ज्योतीताई मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ज्योतीताई मेटे यांनी संवाद दौरा बीड जिल्ह्यात केला. हा संवाद दौरा झाल्यानंतर समाज बांधवांशी चर्चा करून त्यांनी बीड लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या...

बीड आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुलाखत

इमेज
  बीड आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुलाखत बीड, दि.20:(जिमाका) बीड आकाशवाणीवर बुधवारी 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता 39 बीड लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणी बीड केंद्राच्या 102.9 मेगाहर्टस् वर बुधवारी दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता ही मुलाखात प्रसारित केली जाईल. ही मुलाखात आकाशवाणीचे निवेदक गोपाल ठाकूर घेणार आहेत.   39 बीड लोकसभा मतदार संघात निवडणुकीविषयक प्रशासनाने केलेली तयारी. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून राबवत असलेले विविध जागृतीपर उपक्रमांची माहिती या मुलाखतीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी देतील.  बीड आकाशवाणीवरून प्रसारित होणारी ही मुलाखत मतदारांनी ऐकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल

इमेज
  39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल  आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल बीड, दि.20 : (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या तिसऱ्या  दिवशी आज 1  उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.   39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज भारतीय जवान किसान पार्टी( इंडिया) पक्षाचे रामा खोटे यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला.   शुक्रवारी 11 इच्छुक उमेदवारांना 25 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण 80 इच्छुक उमेदवारांना 185 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले.  39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज  दाखल झाले आहेत. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.   सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक ...

परळीत २१ एप्रिल पासून डॉ आंबेडकर जयंती निमित्त फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

इमेज
  परळीत २१ एप्रिल पासून डॉ आंबेडकर जयंती निमित्त फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन परळी(प्रतिनिधी):-     परळीत कर्मचारी, पेंशनर्स व व्यवसायिक यांनी एकत्र येऊन विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव समितीची स्थापना करून 14 एप्रील रोजी परळी शहरातून ' महात्मा फुले- डॉ बाबासाहेब आंबेडकर ' संयुक्त जयंती काढून शहरातील लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला, आणि आाता आज दिनांक 21 एप्रिल पासून व्याख्यानमाली सुरुवात होणार आहे.     फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेतून दिनांक 21 एप्रील ते 26 एप्रील या काळात शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहत, सभागृह येथे दररोज सांय. 7:00 ते 9: 00 यावेळेत विविध विषयावर व्याख्यान देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यामध्ये दि21 एप्रील रोजी संभाजीनगर( औरंगाबाद) येथील फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक मा अरविंद खैरनार हे ' डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत सत्यशोधक चळवळीचे योगदान' या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर दि23 एप्रील रोजी प्रा डॉ मनोहर सिरसाट यांचे ' डॉ बाबासाहेब आंबेडकर या...

बजरंग सोनवणेंचं ठरलं!

इमेज
  बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन न करता दाखल करणार   बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून  पंकजा मुंडे  यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार  बजरंग सोनवणे  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे हे दि. 22 एप्रिलला दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कुठलंही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय बजरंग सोनवणे यांनी घेतला आहे.          त्यांचा अर्ज भरण्यासाठी  जयंत पाटील  तसेच शिवसेनेतील  एक मोठे नेते आणि रजनी पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तर बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते देखील बजरंग सोनवणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. बीडमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता 22 एप्रिल रोजी कुठलीही सभा घेणार नसल्याचे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावरदेखील जोरदार टीका केली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून करून दिला संवाद

इमेज
  काम करते रहो, लडते रहो; आपके बलिदान का आपको जरुर फल मिलेगा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला राजेश दादा विटेकर यांना शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून करून दिला संवाद मोदी फडणवीस विटेकर यांच्या संवादाची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल परभणी (प्रतिनिधी) - परभणी लोकसभेत निवडणूक जिंकण्याची क्षमता असूनही पक्षनिष्ठेसाठी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांचे आज परभणी येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडभरून कौतुक केले. *तुम्ही लढत रहा, तुमच्या या त्यागाचे फळ तुम्हाला नक्किच मिळेल, असे मोदीजी राजेश विटेकर यांना म्हणाले. या संवादाची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.* परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती, या ठिकाणी जवळपास राजेश विटेकर यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेव जानकर यांना मिळाल्यामुळे या ठिकाणचे उमेदवार राजेश विटेकर यांना माघार घ्यावी लागली. अजितदादा पवार यांच्यावर असलेल्या निष...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाचार्य महाराजांनी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडेंना दिले आशीर्वाद

इमेज
  लिंगायत समाजाच्या सात धर्मगुरूंची धनंजय मुंडेंनी घेतली आशीर्वादपर भेट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाचार्य महाराजांनी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडेंना दिले आशीर्वाद बीड (दि. 19) - लिंगायत समाजात आदराचे स्थान असलेल्या विविध 7 मठांच्या धर्मगुरू शिवाचार्य महाराजांची आज बीड शहरात धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी सातही शिवाचार्य महाराजांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांना आशीर्वाद दिले. यावेळी श्री. शांतीलिंग शिवाचार्य महाराज औसेकर, श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, श्री राजलींग शिवाचार्य महाराज परांडकर, श्री कांचबसवेश्वर शिवाचार्य महाराज पाथरीकर, श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर, श्री चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर, श्री चंदबसव महालिंगेश्वर महाराज बरदापुरकर या सातही शिवाचार्य महाराजांचे आज धनंजय मुंडे यांनी बीड शहरात एकत्रित दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी धर्म रक्षणासाठी राजाश्रय नितांत गरजेचा असल्याचे मान्यवर शिवाचार्य महाराज यांनी म्हटले. आम्ही नाथरेकर म्हणजे शिवाचे सेवक, आम्हाला महादेवाच्या सेवेचे व्रत आहे. आजह...