पोस्ट्स

घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले

इमेज
  घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले …………………………………………. गेवराई - प्रतिनिधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये निवडणुकीत अवैध पैशाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी करण्याचे ठरवलेले आहे. गेवराई पोलिसांना खामगाव चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात येत असताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये एक पैसे असलेली लोंखडी पेटी सापडली. त्यामध्ये एक कोटी रुपये   रुपयांची रोकड या ठिकाणी मिळून आली.  खामगाव या ठिकाणी चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी एस.एस.टी पथक खामगाव ता. गेवराई जि.बीड येथुन पथकातील पोकॉ खांडेकर यांनी कळविले की ,वाहन तपासणी करीत अंसताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये  पैसे असलेली एक  लोखंडी पेटी असुन त्यामध्ये एक कोटी रुपये आहेत. सदर बाबत माहिती अति. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार   व पोनि गेवराई यांना माहिती देवुन सदर ठिकाणी भेट दिली. सदर रक्कम वाहतुकी बाबत निवडणुक आयोगाचे बारकोड इ.एस.एम.एस ची कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने सदर एक कोटी रक्कम व इनोव्...

‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प

इमेज
  तांडयांना विकासाचा स्पर्श देणाऱ्या पंकजाताईंना शंभर टक्के मतदान देऊन लोकसभेत पाठवू खा. प्रितमताई मुंडे यांचा गेवराई तालुक्यातील तांडे-वस्त्यांवर प्रचार  ‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प  गेवराई । दिनांक ०४ । बंजारा समाजाच्या प्रत्येक गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांना भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यांनी दिलेल्या निधीमुळेच दुर्लक्षित तांड्याना विकासाचा स्पर्श होऊन विकासधारेच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेला बंजारा समाज आता मुख्य प्रवाहात आला आहे. आमच्या तांडयांना विकासाचा स्पर्श दिल्यामुळे जिल्ह्यातील बंजारा समाज शंभर टक्के पंकजाताईंना मतदान देऊ आणि ताईंना लोकसभेत पाठवू असा निर्धार गेवराई तालुक्यातील बंजारा समाजाने केला. भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा. प्रितमताई मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील तांडे, वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सुरुवातीला खांडवी तांडा येथे भेट दिल्यानंतर सेवाधाम येथील मंदिरात संत सेवालाल महाराज यांचे दर्शन करून ...

जोरदार प्रचार :कामगिरी दमदार

इमेज
  पंकजाताई मुंडेंसाठी रमेश आडसकरांचा माजलगावात घरोघरी जाऊन प्रचार जिल्ह्याला विकसित करायचे असेल पंकजाताई मुंडे विक्रमी मताधिक्याने विजयी होणे आवश्यक - रमेश आडसकर माजलगाव (दिनांक 4) जिल्हा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केले.. आज पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांनी माजलगाव मध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.          बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप मनसे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज माजलगाव शहरांमध्ये महायुतीच्या नेत्यांनी भव्य पदयात्रा काढून मतदारांशी थेट घरोघरी जाऊन संवाद साधला. पंकजाताई मुंडे या विकासाची दृष्टी असलेल्या नेत्या असून राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेली काम आजही चर्चेला जात आहेत. पंकजाताई मुंडे यांनी जलजीवांच्या माध्यमातून मराठवाड्यात अनेक कामे करून पाणी पातळीम...
इमेज
  बजरंग सोनवणे यांना केज तालुक्यातून आणखी एक धक्का सोनवणेंच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश परळी वैद्यनाथ (दि. 04) - महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांना ऐन निवडणुकीत आणखी एक धक्का बसला असून, त्यांच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतचे सरपंच, अन्य सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना बजरंग सोनवणे यांच्या ताब्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या मुलेगाव ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्याने बजरंग सोनवणे यांना निश्चितच याचा फटका बसणार आहे.  मुलेगावचे सरपंच बाळासाहेब लाड, सदस्य सुंदर लाड, बालासाहेब हारगावकर, अश्रुबाई जनार्दन लाड, मेघराज लाड, तुकाराम लाड, शरद हारगावकर, कळमअंबा ग्रामपंचायत सदस्य राजू हिरवे, अक्षय लाड, विनायक लाड, दशरथ लाड यांसह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस...

गणेशपार भागात एलईडी चित्र रथाद्वारे प्रचाराचा शुभारंभ

इमेज
  पंकजाताई मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष-अश्विन मोगरकर  गणेशपार भागात एलईडी चित्र रथाद्वारे प्रचाराचा शुभारंभ परळी वैजनाथ       एलईडी चित्र रथाच्या माध्यमातून पंकजाताई यांनी केलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचणार असून पंकजाताई मुंडे यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते अश्विन मोगरकर यांनी सांगितले.        बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ गणेशपार भागात एलईडी व्हॅन द्वारे प्रचाराचा शनिवारी  मतदार व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धडाक्यात शुभारंभ करण्यात आला.  लोकसभा 2024 च्या प्रचार आता रंगतदार स्थितीत आला आहे. 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर  बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारात भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली आहे. शनिवार दि 4 मे रोजी गणेशपार भागात एलईडी व्हॅन द्वारे प्रचाराचा...

15 सप्टेंबर पर्यंत मुदत

इमेज
  पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन 15 सप्टेंबर पर्यंत मुदत नवी दिल्ली, 02: केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2024 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील.   पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हे पुरस्कार 'उत्कृष्ट कार्याच्या' सन्मानार्थ तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे / विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक ...

आडसकर-जगताप-जयसिंह सोळंकेंसह महायुतीचे नेते व्यासपीठावर

इमेज
  चिंचाळ्यात पंकजाताई मुंडे यांच्या भाषणाने मतदार भावूक ! जिल्हयाच्या विकासासाठी पंकजाताईंना क्रमांक एकची पसंती देण्याचा निर्धार आडसकर-जगताप-जयसिंह सोळंकेंसह महायुतीचे नेते व्यासपीठावर चिंचाळा (वडवणी) ।दिनांक ०२। भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज केलेल्या अभ्यासपूर्ण आणि विकासाचे व्हिजन घेऊन केलेल्या भाषणाने मतदार अक्षरशः भावूक झाले होते. जिल्हयाच्या विकासासाठी पंकजाताईंना सर्वाधिक क्रमांक एकची मते देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.     पंकजाताई मुंडे यांची दुपारी चिंचाळ्यात सभा झाली. सर्व जाती धर्माचे मतदार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते रमेश आडसकर, मोहनराव जगताप, केशवराव आंधळे, जयसिंह सोळंके, वडवणी नगराध्यक्ष शेषराव जगताप, बाबरी मुंडे, संजय आंधळे, भाजपचे तालुकाध्यक्ष पोपट शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, शिवाजीराव तिडके, आजबे ताई, मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, शहराध्यक्ष करण लोंढे, बीड एम पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  पंकजाताई भाषणात म्हणाल्या, 2004 तसेच 2009 मध्ये जिल्हयात फिरत असताना रस्ते ...