पोस्ट्स

अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ?

इमेज
  ● अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ?        मी कोणताही राजकीय व्यक्ती नाही, त्यातीलत मला काही समजत पण नाही, किवा समजावे अशी ईच्छा सुध्दा नाही, तसेच मी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभार्थी नाही, मग हा लेखन प्रपंच कशामुळे? वेळचं आली आहे!            मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागील 24 वर्षांपासून कार्यरत आहे. आज सकाळी एक उच्चभ्रू कुटुंबातील आजी त्यांच्या नातवाला माझ्याकडे लसीकरणासाठी घेऊन आल्या होत्या. अमुक अमुक ठिकाणी चांगला 3500 रुपयांना दिला आज तोच डोस तुमच्याकडे घेण्यासाठी आले आहे. मी ते डोसचे सजवलेले कार्ड पाहिले व अजींना समजावून सांगितले हे सर्व डोस आणि यात अजून एक इंजेक्शन  पोलिओचा डोस आपल्या जवळील ग्रामीण रुग्णालयामध्ये अगदी मोफत मिळतो. आजींनी जरा आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. आणि म्हणाल्या सर 12 वर्षांपूर्वी याचाच मोठ्या भावाला डोस देताना आपण म्हणाला होतात की यातील हे हे डोस सरकारी रुग्णालयात मिळणार नाही. ते आपल्याला इथेच घ्यावे लागतील. मग आता असे का म्हणतात. मी म्हणालो आजीबाई यालाच विकास म्हणतात.      ...

आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा

इमेज
  कर्तृत्वान लेकीच्या विक्रमी विजयावर परळीतील अभुतपूर्व  सभेने केलं शिक्कामोर्तब!  माझ्यावर वैद्यनाथाची सावली म्हणून उभे राहून तुम्हीच आशीर्वाद द्या ! तुमचं प्रेम आहेच- लोकसभेला संधी द्या: जीवाचे रान करुन विकासरुपाने परतफेड करेन - पंकजाताई मुंडे जिल्ह्यातील विकासाचं जे केलय ते आम्हीच केलं आणि जे नाही झालं ते आम्हीच करणार आहोत! आजचा परळीतील मंच अस्वस्थता दूर करून शांती व समाधान देणारा परळी वैजनाथ,।दिनांक ११। बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदानरूपी आशीर्वाद देऊन आपले नेतृत्व करण्याची संधी मला आपण सर्वांनी द्यावी. यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळात काम करत असताना जिल्ह्यातील गाव,वाडी, वस्ती तांड्यापर्यंत विकासाची गंगा आपल्याला आणता आली. तुमचे आशीर्वाद माझे नेतृत्व घडवत आहे. मी विकास केला आहे हे जनता मान्य करते. ही निवडणूक विकासासाठी आहे, राज्याला आणि जिल्ह्याला एकच सरकार हवे आहे.. देशासाठी काम करायची संधी आहे.माझ्यावर तुमचं प्रेम आहेच. यावेळी लोकसभेला संधी द्या.जीवाचे रान करुन विकासरुपाने त्या प्रेमाची नक्कीच परतफेड करेन असा विश्वास पंकजाताई मुंडे ...

आपघात: निष्काळजी:मरणास कारणीभुत:गुन्हा दाखल

इमेज
  स्कार्पीओने धडक दिली : एकाचा मृत्यू एक जखमी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पीओ गाडीच्या चालकाने  वाहन निष्काळजीने चालवून मोटारसायकलस्वारांना उडवले व निघून गेला.मात्र या आपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले त्यापैकी एका जणाचा मृत्यू झाला.या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि.२७/०४/२०२४ रोजी ०१:०० वा. सुमारास परळी जे सोनपठे जाणारे रोडवर इंजेगाव शिवारात सबस्टेशन जवळ पांढऱ्या रंगाच्या एका स्कापीओ गाडीच्या चालकाने गाडी भरधाव वेगात हयगईने निष्काळजीपणे चालवुन मो.सा.क्र.MH-२६/AV-४८०२ हीस पाठीमागुन जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलचे १०,०००/-रुपयाचे नुकसान केले.तसेच फिर्यादी अनिकेत वैजनाथ जळकुटे वय १९ वर्ष व्यवसाय मजुरी रा.तत्तापुर ता. रेणापुर जिल्हा लातुर   व सोमनाथ दिलीप ब्याळे यांना गंभिर जखमी करुन सोमनाथ दिलीप ब्याळे यांचे वय २६ वर्ष रा. आडगाव जिल्हा परभणी मरणास कारण...

परळीत मुस्लिम समाजबांधवांसमवेत धनंजय मुंडेंच्या मॅरेथॉन बैठका

इमेज
  मुंडे कुटुंबीय कधीच जात, धर्म पाहत नाहीत - धनंजय मुंडे परळीत मुस्लिम समाज बांधवां समवेत धनंजय मुंडेंच्या मॅरेथॉन बैठका प्रत्येक बूथवरून मला जसे मताधिक्य दिले, त्यापेक्षा किमान 10 तरी मते ताईंना जास्त द्या - धनंजय मुंडेंचे आवाहन परळी शहरातील मालिकपुरा, इस्लामपुरा बंगला, पेठ मोहल्ला, कुरेशी नगर, जुने रेल्वे स्टेशन परिसर, आझादनगर आदी भागात बैठकांचे सत्र परळी वैद्यनाथ (दि. 09) - परळी वैद्यनाथ शहरात कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मुस्लिम समाज बांधवांसमवेत मॅरेथॉन बैठकांचे सत्र राबवत शेकडो मुस्लिम बांधवांशी भेटून संवाद साधला.  भाजप किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून काही मुस्लिम समाज बांधवांच्या मनात शंका कुशंका पसरवल्या जात आहेत, मात्र परळीतील जनतेची सेवा करताना स्व. मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा, मी स्वतः किंवा पंकजाताई यांपैकी कोणीही कधीही जात धर्माचे राजकारण केले नाही, किंवा भविष्यातही करणार नाहीत याची खात्री सर्व परळीकरांना आहे. कोविड चे संकट असो किंवा विकासाचे कोणतेही काम असो मदत किंवा विकास करताना कधीही मध्ये जात धर्म आम्ही आणत नाही त्या...

पंकजाताईंच्या विजयी मताधिक्यात होणार वाढ !_

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माजलगावांत सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महायुतीचे आवाहन; गडकरींच्या सभेने पंकजाताईंच्या विजयी मताधिक्यात होणार वाढ !  माजलगाव, ।दिनांक ०९। भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री विकासपुरुष नितीन गडकरी यांची माजलगाव येथे उद्या शुक्रवारी दुपारी जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा महायुती प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.       भाजप महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची सुरुवातीपासूनच प्रचारात प्रचंड आघाडी घेतलेली असुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी अंबाजोगाई येथे सभा झाली. त्यानंतर आता  माजलगाव येथे विकासपुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खास पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी येत आहेत. शुक्रवार, दि. १० मे २०२४ रोजी दुपारी १२:०० वा.  जुना मोंढा, येथे ही  सभा होणार आहे. “सबका साथ सबका विकास...

कांदेवाडी येथे कै.शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे किर्तन

इमेज
  कांदेवाडी येथे कै.शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे किर्तन धारूर (प्रतिनिधी) :- कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.१० मे रोजी ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर व दि.११ मे विश्वस्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.        परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य तथा कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्ही आहात जवळ पास । काळाने जरी हिरवले अनंत तुमची छाया । नित्य स्मरते आम्हा अनंत तुमचीच माया ।। वैशाख शु.३ शके १९४६ शुक्रवार दि...

विद्याभारती देवगिरी प्रांताची विमर्श विषयावरील कार्यशाळा संपन्न

इमेज
  भारतीय संस्कृतीचा पाया असणारी कुटुंब व्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत -ॲड. रोहित सर्वज्ञ  विद्याभारती देवगिरी प्रांताची विमर्श विषयावरील कार्यशाळा संपन्न ................... दिनांक आठ मे प्रतिनिधी  राष्ट्रीय संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम सध्या होत आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असणारी एकत्रित कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र सध्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन असणारे विमर्श प्रस्थापित करून हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत. चुकीचे विमर्श समाजावर थोपविले जात आहेत त्यामुळे समाजातील प्रज्ञावंतांनी अभ्यासपूर्वक प्रकट व्हायला हवे. चुकीचे तात्विक,सैद्धांतिक विमर्श समाजासमोर स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विमर्श विभागाचे प्रांतप्रमुख ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी व्यक्त केले.  विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या वतीने नांदेड येथे विमर्श कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा नांदेड येथील सहयोग कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षण वर्ग दिनांक 7 मे ते 8 मे कालावधी...