सौ.संध्या नागुरे (चौधरी) यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान
.jpg)
सौ.संध्या नागुरे (चौधरी) यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान परळी वैजनाथ/प्रतिनिधी येथील विद्यावर्धिनी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. संध्या नागुरे (चौधरी) यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय परळी वैजनाथ येथील उपक्रमशील शिक्षका सौ. संध्या विश्वनाथ नागुरे यांना महाराष्ट्र शिक्षण पॅनल (एमएसपी) च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार नाशिक येथील गुरूदक्षिणा हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, शिक्षण फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकिकरण्यासाठी, राष्ट्रनिष्ठा समाजनिष्ठा ज्ञाननिष्ठा विद्यार्थी निष्ठेपाई कार्य करणार्या शिक्षक शिक्षकांचा नाशिक येथे 24 मे रोजी आयोजित सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शिक्षक प...