पोस्ट्स

बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग

इमेज
  बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग  परळी (प्रतिनिधी)  आपल्या बहीणीस चांगले नांदवा,मारहाण करु नका असे सांगण्यासाठी अहमदपुर तालुक्यातुन परळीत आलेल्या आई व मुलीला मारहाण करत मुलीचा विनयभंग केल्याची घटना परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी परिसरात घडली असुन याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी येथील विवाहीतेस सासरच्या मंडळीकडुन त्रास होत असल्याने अहमदपुर तालुक्यातील तिची बहीण व आई सासरच्या मंडळींना समजावुन सांगण्यासाठी दि.27 मे रोजी परळी येथे आल्या.माझ्या बहीणीला मारहाण करु नका,चांगले नांदवा असे म्हणताच आरोपी अजिज महेबुब सय्यद,सुलतानाबाबु सफियोद्दीन शेख,सीमरन इरफान शेख व अन्य एका महिलेने फिर्यादीची बहिण व आईला मारहाण केली.हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस बॅटने मारहाण करत विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी वरील आरोपींविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोह येलमटे हे करत आहेत

असे करा पिकाचे नियोजन

इमेज
असे करा पिकाचे नियोजन        बीड, दि. 6 (जि. मा. का.) :सध्या जिल्ह्यात सर्व दूर पेरणीला लायक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीची घाई करू नये. साधारणतः 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल व जमिनीत साधारणतः सहा इंच ओल झाली त्यानंतर पेरणी करावी.पेरणी करण्यापूर्वी घरच्या घरी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. रासायनिक खतांचा अति वापरा अयोग्य वापर जमिनीच्या आरोग्यासाठी चांगला नसतो. तेव्हा रासायनिक खते वापर करण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खतांचा बेसल डोस ठरविताना माती परीक्षण अहवाल अथवा गावचा जमीन सुपिकता निर्देशांक याचा वापर करून तो डोस पेरणी वेळी द्यावा. रासायनिक खतांची बचत होण्यासाठी बियाणास जैविक खतांची वीज प्रक्रिया करावी. आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांना संपर्क करून आपण बियाणे उगवण बीज प्रक्रिया आदींचे प्रत्याक्षिक  देखील करू शकता, असे आवाहन जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी  यांनी केले आहे.                                   ...

शंकी गोगलगाय नियंत्रणासाठी उपयोजना

इमेज
शंकी गोगलगाय नियंत्रणासाठी उपयोजना            बीड, दि. 6 (जि. मा. का.)   बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सोयाबीन कापूस भाजीपाला आदी पिकांवर शंकी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या गोगलगायींना वेळीच ओळखून खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पुढील नुकसान टाळता येईल.       शंखी गोगलगाय किडीची ओळख:- शंकीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंकी गर्द, करड्या, फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. ही कीड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने  खाऊन छिद्र पाडते  तसेच नवीन रोपे, कोबं, भाजीपालावर्गी पिके, फळे, फुले तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरी उपजिका करते.      प्रतिबंधात्मक उपायोजना:- शेतकऱ्यांनी ८० ते १०० मी.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीचे खोल नांगरट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावे, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून गोगलगायना लपण्यास व अंडी घा...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

इमेज
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बाबींची पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम            बीड, दि. 6 (जि. मा. का.) शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- लाभ अदा करण्यात आला आहे.        लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील 90.20 लाख लाभार्थ्यांनी केलेली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 05 जून, 2024 ते 15 जून, 2024 या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.       या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व e-KYC साठी राज्यात...

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

इमेज
खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन बीड, दि. 6 (जि. मा. का.) :- सध्या खरीप 2024 हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे खते व नंतर औषधे खरेदी करत असतात त्यांना उत्तम दर्जाचे खते बियाणे व औषध उपलब्ध व्हावे, योग्यरीत्या किमतीत उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्यात गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाची कार्य कक्षा तालुकास्तरावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी तथा निरीक्षक यांच्यापर्यंत आहे       खरीप हंगामात या दोन्ही कार्यालयात तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यांची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत अशी आहे. याशिवाय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांची भरारी पथके कार्यरत आहे.        जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी व जिल्हा गुणवत्ता निरिक्षक यांचे भरारी पथक कार्यरत आहे. याशिवाय राज्यस्तरावरील कक्षाचे व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत...

पंकजा मुंडे यांनी केली आभार दौऱ्याची घोषणा: संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा

इमेज
  पंकजा मुंडे यांनी केली आभार दौऱ्याची घोषणा: संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा  परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...      नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पराभवानंतरही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि खंबीरपणा दाखवला आहे. यातच आता पंकजा मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात आपण लवकरच आभार दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.         संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरण करणारी निवडणूक झाली. अशा विपरीत आणि कठीण परिस्थितीत झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी शेवटपर्यंत लढा दिल्याचे निकालानंतर दिसून आले. या  पराभवानंतर स्वस्थ न बसता बीड जिल्ह्यातील जनतेने  भरभरून प्रेम आणि सन्मान मतांच्या माध्यमातून आपल्याला दिला. याचे सदैव ऋण आपल्यावर असणारच आहे असे म्हणत लवकरच आपण संपूर्ण बीड जिल्ह्याचा आभार दौरा करणार असल्याचे ...

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

इमेज
पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट: परळीत पोलिसांनी एकाला केली अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल निवडणूक निकालानंतर अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.         याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार  परळी शहरातील गणेशपार भागात राहणारा गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुकवर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओखाली पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वाक्य लिहून ही पोस्ट व्हायरल केली.यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सखोल चौकशी करत या युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ ताब्यात घेतले.            याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस कर्म...