इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

पंकजा मुंडे यांनी केली आभार दौऱ्याची घोषणा: संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा

 पंकजा मुंडे यांनी केली आभार दौऱ्याची घोषणा: संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा



 परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...

     नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पराभवानंतरही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि खंबीरपणा दाखवला आहे. यातच आता पंकजा मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात आपण लवकरच आभार दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

        संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरण करणारी निवडणूक झाली. अशा विपरीत आणि कठीण परिस्थितीत झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी शेवटपर्यंत लढा दिल्याचे निकालानंतर दिसून आले. या  पराभवानंतर स्वस्थ न बसता बीड जिल्ह्यातील जनतेने  भरभरून प्रेम आणि सन्मान मतांच्या माध्यमातून आपल्याला दिला. याचे सदैव ऋण आपल्यावर असणारच आहे असे म्हणत लवकरच आपण संपूर्ण बीड जिल्ह्याचा आभार दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. येत्या 12 जून किंवा 15 जून पासून बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण आभार दौऱ्याच्या निमित्ताने जाणार असून बीड जिल्ह्यातील तमाम जनतशी संवाद साधणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या