पोस्ट्स

पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट

इमेज
पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट वंचितांच्या लढ्यासाठी मी सोबत ; सरकारने हे उपोषण सन्मानाने सोडवावं जालना ।दिनांक १७। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची उपोषण स्थळी जावून भेट घेतली. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. दरम्यान वंचितांच्या लढ्यात मी या दोघांसोबत आहे. सरकारने सन्मानाने त्यांचे उपोषण सोडवून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.   मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. आज संध्याकाळी पंकजाताईंनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.     यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “दोन दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेले आहे. मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण दादा रडायला लागले. ताई, तुमच्या पराभवामुळे चार लोकांनी आत्महत्या केल्या, मला बघून रडू येतंय. परिस्थिती हाताळत असल्याने याला क...

शासनाची भूमिका माय-बापाची असावी

इमेज
प्रा.लक्ष्मण हाके आणि सहकाऱ्यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने बघावे- पंकजा मुंडेंचे ट्विट शासनाची भूमिका माय-बापाची असावी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.अशा प्रकारचे ट्विट भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे.        ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सरकारचे लक्ष वेधले आहे. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचे ...

शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत

इमेज
आगामी निवडणूका शिवसेना ताकदीने लढणार व जिंकणार-संजय भांबरे शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत परळी/प्रतिनिधी शिवसेनेचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे हे आज शनिवार दिनांक 15 जुन रोजी परळी शहरात आले असता परळीत शिवसैनिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान आगामी नगर परिषद, विधानसभा तसेच सर्व निवडणूका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ताकदीने लढणार व जिंकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांनी बोलतांना केले. शिवसेना नेते तथा परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांचा आज शनिवारी परळीत दौर्‍यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी आगामी नगर परिषद, विधानसभा निवडणूकासंदर्भात चर्चा केली. प्रारंभी शिवसैनिकांनी त्यांचे भगवी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  यावेळी शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालिवाल, जेष्ठ नेते सतीश जगताप, माजी नगरसेवक रमेश चौडे, युवा नेते संजय कुकडे, संजय सोमणे, श्रीनिवास सावजी...

आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!

इमेज
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार - प्रा.टी.पी.मुंडे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा! परळी वैजनाथ, प्रतिनिधी  ओबीसींच्या प्रश्नासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावामध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. या आमरण उपोषणाला त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असल्याने उपोषण स्थगित केले त्याच्या विरोधात ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसीचे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असून ते आरक्षण मराठा समाजाला देता कामा न...

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम ......!

इमेज
डॉक्टर, इंजिनियर विद्यार्थी घडविण्याऐवजी जबाबदार नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी-सौ. श्रद्धा चनाखेकर नांदेड - दि. १५जून २०२४ डॉक्टर इंजिनियर विद्यार्थी घडविण्यापेक्षा या देशाचे जबाबदार व संवेदनशील, पर्यावरण संवर्धक नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अभ्यासेतर उपक्रम, छंद, खेळ यात सहभागी होणे गरजेचे आहे. सध्या पालकांना केवळ मोठ्या इमारती व सूटबूट , टाय मधील विद्यार्थ्यांच्या शाळा पसंत पडत असल्या तरी अशा शाळांमधून केवळ परीक्षार्थी विद्यार्थी घडविले जातात.परंतु भौतिक सुविधा कमी असतानाही लहान शाळांमधूनही संस्कारक्षम शिक्षण व गुणवत्ता मिळू शकते हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित  नांदेडच्या कै. नाना पालकर प्राथमिक शाळेने सिद्ध केले आहे असे प्रतिपादन नांदेड येथील सुप्रसिद्ध गायिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा चनाखेकर यांनी केले. तसेच स्पर्धा परिक्षांमधून यश मिळवणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचे दाखले त्यांनी यावेळी दिले.  भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित कै. नाना पालकर प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमप्...

आर्थिक मदतीसह पोपटराव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे

इमेज
आत्महत्या केलेल्या पोपटराव वायभासे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट निवडणुका, जय-पराजय होत राहतात मात्र त्यातून कुणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब - धनंजय मुंडे आर्थिक मदतीसह पोपटराव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे आष्टी (दि. 14) - लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभासे या तरुणाने आत्महत्या केली होती. आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  निवडणुकांमध्ये जय - पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  दरम्यान मयत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी ...

इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

इमेज
  बापाची जिद्द अन् लेकीची मेहनत: शेतमजुराची मुलगी होणार डॉक्टर! इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     महत्त्वकांक्षापुढे भल्या भल्या अडचणीही गुडघे टेकतात, हे फक्त ऐकले होते. पण येथे मात्र ते प्रत्यक्षात बघायला आणि अनुभवायला मिळाले. इंजेगाव येथील एका सालगड्याची मुलगी चक्क नीट परीक्षेत तब्बल 637 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. आई आणि वडील दोघेही दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात आणि त्यांना साधी अक्षर ओळख ही नाही, मात्र वडिलांच्या जिद्दीला आणि मुलीच्या मेहनतीला फळ मिळाले. इंजेगाव येथील वैष्णवी भरत मुंडे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 637 गुण घेऊन घऊघवीत यश मिळवले. या यशाचा ग्रामस्थांना अभिमान असून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. वैष्णवी मुंडे मात्र याचे सर्व श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना देते.         भरत पंढरीनाथ मुंडे आणि चांगुणाबाई मुंडे या इंजेगाव येथील दंपत्याची वैष्णवी ही मुलगी... अल्पभूधारक शेतकरी असलेले भरत मुंडे हे इतरांच्या ...