पोस्ट्स

आ.धीरज देशमुखांचे पत्र

इमेज
  मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवा: आ.धीरज देशमुखांचे पत्र मराठा आरक्षणासाठी पावसाळी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवून चर्चा घडवावी, अशी मागणी  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. या मागणीचे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांना गुरुवारी दिले. पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत होत आहे. मराठा समाजाच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आणि सगे-सोय-यांच्या निकषात बसणारे आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावे लागत आहे. सरकार या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशनातील एक दिवस मराठा आरक्षणासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. यावर्षी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेत राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले, त्यातील तरतुदी आणि जानेवारीमध्ये वाशी येथे जरांगे पाटील यांना सरकारने दि...

मुला मुलींना घेतले दत्तक

इमेज
  मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या देठे कुटुंबीयांना मंत्री तानाजी सावंत यांनी दिला आधार  मराठा समाजाच्या सुख दुःखात कायम पाठीशी राहणार- मंत्री प्रा. तानाजी सावंत पुणे,(प्रतिनिधी):- मराठा आरक्षणासाठी नुकतीच आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांना राज्याचे कुटुंब व कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी सांत्वन पर भेट देऊन त्या कुटुंब यांना आधार देत 5 लाख रुपये सुपूर्द केले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या सुखदुःखात आपण कायम पाठीशी राहणार असल्याचे कुटुंब बालकल्याण मंत्री मराठा भूषण प्राध्यापक तानाजी सावंत यांनी सांगितले.  वाघोली, पुणे येथे मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कै.प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजी सावंत यांनी भेट घेत सांत्वन केले. त्या कुटुंबाला पाहता क्षणी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांना अश्रू अनावर झाले. समाजाप्रती असलेला कळवळा व समाजाला मदत करण्याची दानत त्यांनाच असते. ज्यांना आपल्या मातीला व समाजाला बसलेल्या चटक्याची जाण असते. याचीच प्रचिती येत आहे. मंत्री प्रा. तानाजी सावंत ...

शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध

इमेज
  शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध महामार्ग रद्द अधिसूचना सरकारने काढावी; बाधित शेतकऱ्यांची मागणी परळी / प्रतिनिधी पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ मार्गास राज्यात शेतकऱ्यांना कडाडून विरोध होत असून राज्य सरकार हा प्रस्तावित महामार्गास स्थगिती दिल्याचे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे.स्थगिती नकोय महामार्ग रद्द करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात यावी अन्यथा बाधित शेतकरी आपल्या कुटूंबासह हे आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशारा परळी-अंबाजोगाई येथील बाधित शेतकऱ्यानी सरकारला दिला आहे. नागपूरपासून गोव्यादरम्यान महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे जोडण्यासाठी, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी मागणी नसताना देखील समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आणखी लांब पल्ल्याचा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आला होता.राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या उभारणीस तब्बल 86 हजार कोटी खर्च येणार असून या महामार्गासाठी 27 हजार एक्कर पेक्षा अधिक शेतजमीन शासन संपादित करणार आहे.नागपूर-रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना देखील हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शेतकऱ्...

फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'

इमेज
  फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'     लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभवही भाजपाला मोठा धक्का देणारा ठरला. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. पंकजा मुंडे यांना आणि ओबीसी समाजाला प्रातिनिधीत्व देणं गरजेचं असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.        लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेवर पाठवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या समर्थकांकडून पक्षश्रेष्ठींना विनंती केली जात आहे. दरम्यान राज्यसभा किंवा आता ज्या कोणत्या जागा रिक्त होतील, तेव्हा पंकजा मुंडेंची वर्णी लावावी, अशी विनंती फडणवीसांनी भाजपच्या...

परळी आगाराकडून विद्यार्थ्यांनीना शाळेतच प्रवास पास वाटप

इमेज
  विद्यार्थ्यांचा प्रवास एसटीच्या मदतीने होणार सुखकर ●परळी आगाराकडून विद्यार्थ्यांनीना शाळेतच प्रवास पास वाटप परळी / प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या विविध सवलतीच्या योजना पासून शाळा आणि शालेय विद्यार्थी दूरच राहिले आहेत त्यामुळे यावर्षी बीड विभागातील परळी वैजनाथ एसटी आगाराकडून विद्यार्थी प्रवास पास सवलतीसह अनेक सवलतींच्या योजनांची माहिती प्रत्येक शाळेत पोहोचवली जात आहे परिणामी विविध प्रवासांच्या योजना विद्यार्थी वर्गाला तसेच शिक्षकांना समजण्यास मदत मिळत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवास आता सुखकर होण्यास मदत होणार आहे. जूनच्या मध्यावर शाळा सुरू होतात ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मासिक प्रवास पास करिता मोठी गर्दी होत असते. पाचवी ते बारावीपर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही योजना विद्यार्थिनी साठी मोफत पास योजना असल्याने या योजनेस प्रतिसाद चांगला मिळतो. या योजनेशिवाय विद्यार्थी आणि शाळा पर्यंत एसटी महामंडळाच्या इतर प्रवासाच्या सवलतीची माहिती पोहोचली जात नव्हती परिणामी विद्यार्थी वर्ग याबाबत अनभिज्ञ राहत होता मात्र याबाबत परळी वैजनाथ एसटी आग...

श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 1 जुलै रोजी परळी शहरात आगमन

इमेज
 श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 1 जुलै रोजी परळी शहरात आगमन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवार दि.01 जुलै 2024 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे. शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असुन येत्या 1 जुलै  सोमवारी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहरातील अग्रवाल लॉज, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक मार्गे जगमित्र नाना मंदिर ह्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. सोमवार सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची  देणगी हासानंद बेगराज सामत कापड दुकान व अतुल क्लॉथ येथे स्विकारली जाईल. सर्व कापड व्यापारी व विविध व्यापारी यांच्याकडुन पालखीची सेवा व व्यवस्था केली जाते अशी माहिती विजय हासानंद सामत (मो.9850771177), विक्रम देशमुख, श्रीकांत गुंडाळे, रंजित ...

भावपुर्ण श्रद्धांजली.......

इमेज
अयोध्येतील श्रीरामलल्ला  प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य विधीचार्य लक्ष्मीकांत दीक्षित कालवश, देशभरातील भक्तांवर शोककळा अयोध्येतील राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य विधीचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आचार्य मागील काही दिवसांपासून आजारी होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात १२१ पुरोहीतांनी सहभाग नोंदवला. या पुरोहितांचे नेतृत्व लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केलं होतं. आज सकाळी ६.४५ वाजता दीक्षित यांचं निधन झालं. त्यांचा मृतदेह सध्या घरी असून मणिकर्णिका घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.           त्यांच्या निधानाने काशीसहित देशभरातील भक्तांवर शोककळा पसरली आहे. पं.आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांचं निवासस्थान मंगलागौरीहून निघणार आहे. आचार्य लक्ष्मीकांत यांचा सामावेश काशीतील मोठ्या पंडितामध्ये होतो. त्यांची भारतीय सनानत संस्कृती आणि परंपरेवर प्रचंड उच्चकोटीची आस्था होती. लक्ष्मीकांत हे वाराणसी...