पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे

इमेज
  शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे शासन प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी सोमवार दिनांक 22 जुलै पासून राज्यभरात शासनास स्मरणपत्र व निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे *ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन एक हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात यावी मुला मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे  प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे  या सह समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षात शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे अनेक वेळा आंदोलन करून निवेदन देऊनही सरकारने दुर्लक्ष केले यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्याची निवेदन दिले आंदोलनाचा भाग म्हणूनच जालना येथील गांधी चमन येथे 28 नोव्हेंबर 2023 रोजी दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले पालकमंत्र्याच्या लेखी...

परळी मतदारसंघात नवीन 23 मतदान केंद्र होणार; एकूण मतदान केंद्राची संख्या 363 प्रस्तावित

इमेज
परळी मतदारसंघात नवीन 23 मतदान केंद्र होणार; एकूण मतदान केंद्राची संख्या 363 प्रस्तावित बीड, दि. 20,  : 39 बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ असून एकूण मतदान केंद्र 2344 इतके होते आता यामध्ये 73 ने वाढ हे मतदान केंद्र आता 2416 इतके होतील.       विधानसभा मतदारसंघ 228 गेवराई, मूळ मतदान केंद्राची संख्या 197, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 7, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 404 ,प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 5, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 14, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 2 होणार आहे.             229 माजलगाव, मूळ मतदान केंद्राची संख्या 178, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 16, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 393 ,प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 2, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणांबद्दल 15, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 8 होणार आहे. 230 बीड, मूळ मतदान केंद्राची संख्या 376 ,प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 20, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 396, प्रस्तावित विलीन/ वि...

परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रदुषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल: जनहित याचिकेवरुन महाजनको व प्रदुषण मंडळाला बजावली नोटीस

इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रदुषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल: जनहित याचिकेवरुन महाजनको व प्रदुषण मंडळाला बजावली नोटीस परळी वैजनाथ: बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज प्रकल्पामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाविरोधात वडगाव दादहरी ग्रामपंचायतीच्या सरपंचाने दाखल केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी करताना या रिटचा जनहितार्थ निर्णय घेतला आहे. याचिकेचे जनहितार्थ रुपांतर करत  13 ऑगस्ट पर्यंत बाजू मांडण्याविषयी महाजनको व प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटिस जारी केल्या आहेत.           न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांचा समावेश असलेल्या हायकोर्टाच्या खंडपीठाने परळी वैजनाथ औष्णिक प्रकल्पातून वर्षानुवर्षे निघणाऱ्या फ्लाय ॲश तसेच स्लरीमुळे आजूबाजूच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नापीक जमिनीत रूपांतर होत असल्याची गंभीर दखल घेतली आहे. पशुधन तसेच मानवी जीवनावर थेट परिणाम होत असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजनको), आणि महाराष...

साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं लोकार्पण

इमेज
  परळीत आता 'तिसरा डोळा' ठरेल ‘विघ्नहर्ता’ - ना.धनंजय मुंडे साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते झालं लोकार्पण परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजली जाणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी यंत्रणा सर्वांसाठीच ‘विघ्नहर्ता’ ठरणार असल्याचा विश्वास कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालामंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे परळीत ना. धनंजय मुंडे  यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.               जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीमधून साडेतीन कोटी रुपये तरतूद करून ही यंत्रणा परळी कार्यान्वित करण्यात आली आहे. परळीतील हा तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेचा लोकार्पण सोहळा परळी पोलीस ठाण्यात ना. धनंजय मुंडे यांच्...

अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा

इमेज
  परळीत डेंगूची साथ; नगरपालिकेने जंतुनाशक फवारणी करावी - प्रा.विजय मुंडे सात दिवसाच्या आत संपूर्ण परळी शहरात फवारणी करावी अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा!  परळी वैजनाथ प्रतिनिधी  परळी शहरामध्ये सध्या डेंगूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नगरपालिका प्रशासनाने कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली नाही त्यामुळे डेंगूची साथ पसरत चालली आहे येत्या सात दिवसांमध्ये फवारणीला सुरुवात करावी अन्यथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल तसेच पालिकेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा परळी मार्केटचे माजी उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी दिला आहे.     सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गेल्या चार दिवसापासून शहरासह परिसरात चांगल्या प्रकारचा पाऊस झाला असून शहरात अनेक ठिकाणी नाल्या दुरुस्त नाहीत सगळीकडे खड्डे असल्यामुळे तेथे पावसाचे पाणी साठल्यामुळे तेथे डेंगूच्या मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत...

मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?

इमेज
  मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ? मुंबई, प्रतिनिधी....      परळीसह बीड रेल्वेप्रश्नांवर मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भातील प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.           केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आज ना.धनंजय मुंडे व भाजप राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय  मुंडे यांच्या समवेत शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले. Click - ■ मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह घेतली बीड रेल्वेप्रश्नांवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट रेल्वे...

प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील - रेल्वेमंत्री

इमेज
  मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह घेतली बीड रेल्वेप्रश्नांवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट  मुंबई, प्रतिनिधी....      परळीसह बीड रेल्वेप्रश्नांवर मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भातील प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.        केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णवजी यांची आज ना.धनंजय मुंडे व भाजप राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय  मुंडे यांच्या समवेत शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले. Click : ■ मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?        स...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!