पोस्ट्स

वैद्यनाथास अभिषेक,महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

इमेज
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस : परळी शिवसेनेकडून उत्साहात विविध उपक्रम  वैद्यनाथास अभिषेक, महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप  परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.  शिवसेनेचे नेते तथा मराठवाडा संपर्क नेता आमदार सुनील प्रभू यांच्या आदेशावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, शिवसेना मराठवाडा समन्वय विश्वनाथ नेरुळकर, बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख परशुराम जाधव, लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील धांडे सर, बीड जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंभोरे , बीड  जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायणराव सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                बारा ज्योतिर्...

सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन

इमेज
  संवैधानिक पदावरील निवडीनंतर पंकजाताई मुंडे प्रथमच 29 रोजी बीड जिल्ह्यात: सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन परळी वैजनाथ,प्रतिनिधी....         भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे 29 जुलै रोजी बीड जिल्ह्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडी तसेच राज्याच्या वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड या अर्थाने संवैधानिक पद घेतल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात कोणतेही हार तुरे अथवा सत्कार त्या स्वीकारणार नसून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्या महापुरुषांना वंदन करणार आहेत.        महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य म्हणून पंकजाताई मुंडे यांची निवड झाली. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हत्या. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात निवड झाल्यानंतर प्रथमच त्या आपल्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात हार-तुरे नको, सत्कार नको, माझ्या स्वागताचा बडेजाव करू नका असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे....

संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त,रक्तदान शिबिर,गुणवंतांचा सत्कार

इमेज
  संत सावतामाळी मंदिरात २८ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन  संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त,रक्तदान शिबिर,गुणवंतांचा सत्कार  परळी (प्रतिनिधी)  संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात रविवार दि.28 जुलै ते रविवार दि.4 ऑगस्ट या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमीत्त संत सावता महाराज चरित्र,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यावर्षी पहाटे ४ ते ६ काकडा भजन,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,१९ ते १ गाथा भजन,२ ते ४ श्री संत सावता महाराज चरित्र,५ ते ६ धुपारती,रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, १० ते १२ जागर असे कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात रविवार दि.२८ जुलै रोजी ह.भ.प. क्षीरसागर महाराज उखळीकर,दि.२९ जुलै रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले,दि.३० जुलै रोजी ह.भ.प.विठ्ठल महाराज,दि.३१ जुलै रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख,द...

इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात

इमेज
  इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात   परळी:इनरव्हील क्लब क्लबच्या अध्यक्षपदी श्रध्दा नरेश हालगे यांची सर्वानुमते नियुक्ती झाली असून त्यांनी अध्यक्ष पदाचा पदभार नुकता स्वीकारला आहे. इनरव्हील क्लब ऑफ परळी वैजनाथ चा पदग्रहण सोहळा   येथील   गांधी मार्केट सर्वेश्वर मंदिर  मध्ये पार पडला . या कार्यक्रमाची सुरुवात इनरव्हील गीतेने झाली .त्यानंतर गणेश पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा विद्या गुजर यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा सादर केला नंतर नूतन अध्यक्षा श्रध्दा नरेश हालगे यांना चार्टर पिन Collar देऊन पदभार सोपवला उपाध्यक्ष: उर्मिला कांकरिया ,सेक्रेटरी- विजया दहिवाळ ,ट्रेझर -तारा अग्रवाल आय एस ओ- छाया देशमुख -एडिटर शैलजा बाहेती यांनीही पदभार स्वीकारला.तसेच इसी मेंबर म्हणून उमा समशेट्टी, स्मिता ठक्कर, दुर्गा राठौर ,अनिता धुमाळ शोभना सौदळे यांची निवड करण्यात आली  इंटरनॅशनल इनरव्हील क्लब 32 वर्षांपासून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. असेच अजून चा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परळी विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीक अण्णा कराड

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :परळी विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने प्रत्येक विधानसभानिहाय शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.            बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय समिती गठीत केली आहे. या अनुषंगाने परळी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र असलेल्या सनियंत्रण समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व  सनियंत्रण करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. वाल्मीकअण्णा कर...

श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात

इमेज
  श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात  परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)                 श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता.२१) गुरुपौर्णिमा ते रविवारी  (ता.२५) आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. या चार्तुमास सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कपीलधार पंच कमिटी व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.              स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ५० वर्षांपूर्वी सुरू...

शेतमजूर युनियनची तहसीलवर निदर्शने

इमेज
  शेतमजूर युनियनची तहसीलवर निदर्शने परळी / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा)  परळी तालुका कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवार दि 25 रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी तालुक्यातील अनेक गावातुन मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आले होते. भूमिहीन शेतमजूर, वृद्ध , निराधार व  ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळ सुरू करा. राज्य सरकारने या महामंडळासाठी निधीची तरतूद करावी.भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण गरिबांना सामाजिक सुरक्षा देणारा सर्वंकष केंद्रीय कायदा करावा.केरळ राज्याच्या धर्तीवर बेघरांना घरकुलासाठी सात लाख रुपये अनुदान द्यावे.विधवा व निराधार महिलांचे कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणासाठी व लग्नासाठी अर्थसहाय्य करण्यात यावे.ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे राशन कार्ड नाही त्यांना राशन कार्ड वाटप करून स्वस्तात धान्य वाटप करावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) परळी तालुका कमितीकडून तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली. या प्रसंगी युनियनचे सय्यद रज्जाक,कॉ. सुदाम शिंदे,कॉ. सखाराम शिंदे...