पोस्ट्स

कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ

इमेज
  कृषी महोत्सव परळी : शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ - धनंजय मुंडे यांचा निर्णय कृषी महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा आज चौथ्या दिवशीही राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांची कृषी व पशु प्रदर्शनास भेट, सर्वच स्टॉल्स वर दिवसभर प्रचंड गर्दी आजच्या तांत्रिक सत्रात ड्रोन द्वारे फवारणीची प्रात्यक्षिके, कीड रोग नियंत्रणावर सखोल मार्गदर्शन परळी वैद्यनाथ, दि. 24: परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, या प्रदर्शनास आता एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. चौथ्या श्रावण सोमवारी देखील आता कृषी महोत्सव सुरू असणार असून, हा महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा करण्यात येत आहे.  राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहित्ती शेतक-यापर्यंत पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्...

तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन

इमेज
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मेश्राम परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         समाजाच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्या योजनाचा सामान्य माणसांना लाभ होणे अपेक्षित आहे त्यासाठी आमचे प्रयत्न असून या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मेश्राम मॅडम यांनी केले.         पंचायत समिती परळी वैजनाथ येथे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थी पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागासबहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती मेश्राम मॅडम उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण बारगजे  (निरीक्षण इतर मागास बहुजन कल्याण बीड), बालासाहेब नागरगोजे (गटविकास अधिकारी परळी वैजनाथ) , जीवन राठोड (अध्यक्ष लेंडेवाडी आश्रम शाळा), प्राचार्य उल्हास पवार (शिवाजीनगर आश्रम शाळा), जाधव सर (प्राचार्य कौडगाव आश...

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे सोमवारी आयोजन

इमेज
  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे सोमवारी आयोजन परळी वैजनाथ/प्रतिनिधी  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.  परळी शहरातील पंचवटी नगर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक जवळ शांती भवन येथे सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दहीहंडी, राधाकृष्ण देखावा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बदलापूर घटना: परळीत महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून निषेध करत प्रशासनाला दिले निवेदन

इमेज
  बदलापूर घटना: परळीत महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून निषेध करत प्रशासनाला दिले निवेदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         बदलापूर येथील शालेय मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना व महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महाराष्ट्र बंद चे आवाहन केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा बंद मागे घेतलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले. त्याच अनुषंगाने परळी येथेही महाविकास आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.          महाविकास आघाडीकडून देण्यात आलेलिया निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,बदलापूर येथे शाळेतील ४ वर्ष व ६ वर्ष वयाचा विद्यार्थिनी वर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केलेला उघड झाला असून प्रकरण दडपण्या साठी शाळेतील संस्थेने व फिर्याद देण्या साठी जाणूनबुजून चालढकल केलेली असून संबंधित प्रत्येक घटकावर कडक कार्यवाही करून आरोपीला कडक शासन करावे व अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी ची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्रात महिलांवर ...

संत भगवानबाबा जन्मोत्सव साजरा

इमेज
  संत भगवानबाबा जन्मोत्सव साजरा  पाटोदा /अमोल जोशी...             पाटोदा  शहरातील माऊलीनगर भागात श्री सुनील खाडे यांच्या निवासस्थानी असलेल्या संत  भगवान बाबा व संत वामनभाऊ मंदिरात श्री संत भगवान बाबा यांचा 128 वा जमोत्सव सोहळा शनिवारी  पहाटे सूर्योदयाला अभिषेक व जमोत्सवाचे पाळणे घेऊन  साजरा करण्यात आला व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला सुनील खाडे यांनी सपत्नीक अभिषेक केला या जन्मोत्सव सोहळ्यास पाटोदा शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान बाबांच्या दर्शनासाठी  दिवसभर भाविक येत आहेत.

तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना रेशीम शेतीवरील विस्तृत मार्गदर्शन व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा

इमेज
  परळी वैद्यनाथ कृषी महोत्सव : तिसऱ्या दिवशीही राज्यभरातील शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना रेशीम शेतीवरील विस्तृत मार्गदर्शन व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा दर महिन्याला नोकरदाराप्रमाणे पैसा देणारी रेशीम शेती; शेतकऱ्यांनी नक्की प्रयोग करावा - महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम, नागपूर परळी वैद्यनाथ (दि. 23) - परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज देखील राज्यभरातून शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी याठिकाणी भेट देऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत. गडचिरोली, अमरावती, नागपूर, रत्नागिरी, रायगड ते अगदी कोल्हापूर पासून या प्रदर्शनास शेतकरी बांधवानी उदंड प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.  कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध कृषी उत्पादने व उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या स्टॉल्स वर खरेदीसाठी पुरुषांसह महिलांची देखील मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.  तांत्रिक सत्रात रेशीम शेतीवर मार्गदर्शन बदलत्या व असंतुलीत हवामानात शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने रेशीम शेती हा अत्यंत उपयुक्त पर्य...

काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून होणार निषेध

इमेज
  बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीचा परळी बंद मागे-बहादुरभाई,ॲड.जीवनराव देशमुख   काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून होणार निषेध परळी प्रतिनिधी बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र बंदच्या समर्थनात परळी बंदची हाक देण्यात आली होती.राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही,असा निर्णय दिला असल्याने उच्च न्यायालयाचा सन्मान करत आजचा परळी बंदचा निर्णय परळी महाविकास आघाडीने माघे घेतला आहे.असे परळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई, रा.काॅ. शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. म...