ऊर्जा विभागाकडुन शासन निर्णय निर्गमित; क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा
धनंजय मुंडेंचे परळी क्रीडा संकुल उभारणीसाठी मोठे पाऊल, महानिर्मितीची 5 हेक्टर 30 आर जागा क्रीडा संकुलासाठी मोफत हस्तांतरित! ऊर्जा विभागाकडुन शासन निर्णय निर्गमित; क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा मुंबई (दि. 14) - परळी वैजनाथ शहरातील व तालुक्यातील नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठे पाऊल उचलले असून, परळी शहरालगतच्या जलालपूर येथील 5 हेक्टर 30 आर जागा क्रीडा संकुलास मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून ऊर्जा विभागाने घेतला आहे. सदर 5 हेक्टर 30 आर जमीन महानिर्मिती कडून मोफत घेऊन ती महसूल विभागास हस्तांतरित करण्यात येत असून, याबाबातचा शासन निर्णय आज उद्योग-ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केला आहे. त्यामुळे आता परळीच्या क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. परळीच्या मातीतून विविध क्रीडा प्रकारातील अनेक खेळाडू राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. दरवर्षी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर क्रिकेटसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले जाते. मात्र