पोस्ट्स

इमेज
छ. संभाजीराजेंचे मस्साजोगमधील मंत्रीपदाबाबतचे 'खोडा' घालणारे वक्तव्य- माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी 'खोडले' ! बीड: एमबी न्यूज वृत्तसेवा....        स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांचे सांत्वन करायला आलेल्या छ. संभाजीराजे यांनी मंत्रीपदीबाबत खोडा घालणारे वक्तव्य केलं होतं.या वक्तव्याला खोडणारे वक्तव्य आता माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी केलं आहे.                  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर माजी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठे विधान केले आहे. देशमुख खून प्रकरणातील सर्व धोगेदोरे पोलिस तपासतील आणि या प्रकरणामागील जो सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही त्यांनी केला.          ...
इमेज
  परळी लोकन्यायालयात 65 प्रकरणे तडजोडीने निकाली परळी वैजनाथ  परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली.  दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व प्रकरने मिटले 39 आणि रक्कम वसुली 4149500 रुपये प्रकरणे व फौजदारी व दिवाणी प्रलंबित 26  प्रकरणे तडजोडीने रक्कम वसुल 3190355 रुपये मिळून एकूण  65  प्रकरणांमध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आली एकुण रक्कम वसुल 7339855 रुपये करण्यात आली .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या एस बी गणाप्पा न्या डि आर बोर्डे  अँड सोनिया मुंडे अँड दत्तात्रय आंधळे यांनी काम पाहिले. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या डि व्ही गायकवाड, परळी वकील संघाचे अध्यक्ष अँड एच व्ही गुट्टे अँड.आर.व्हि.गित्ते अँड आर व्हि देशमुख अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड वैजनाथ नागरगोजे अँड.दिलीप स्वामी अँड प्रभाकर सातभाई अँड वसंतराव फड उ...
इमेज
  वनपरिक्षेत्र कार्यालया परिसरात श्री. दत्त जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      वनपरिक्षेत्र कार्यालया परिसरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी दत्तजयंतीनिमित्त पुजा व आरती करण्यात आली.        परळी वनपरिक्षेत्र कार्यालया परिसरात श्री दत्त जयंती भक्तीभवाने साजरी करण्यात आली. यावेळी  परळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री मनोहर पुंड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी इरिगेशन कॉलनी, विद्यानगर, तहसील  कॉलनी,परिसरातील कर्मचारी, महिला, पुरुष नागरिक मोठ्या भक्तीभावाने उपस्थित होते. महाआरती नंतर वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याचाही भाविकांनी लाभ घेतला.
इमेज
श्री बजरंगबली वेताळ मंदिरात भक्तीभावाने श्री दत्त जयंती उत्साहात साजरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष  परळी वैजनाथ/ प्रतिनिधी जागृत देवस्थान असलेल्या श्री बजरंगबली वेताळ मंदिरात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती, ज्यात काकडाआरती, पूजा, महाआरती, तीर्थ प्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण समाविष्ट होते. मंदिराच्या सजावटीला विशेष महत्त्व देण्यात आले होते, ज्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि मनमोहक दत्त मंदिराची अलंकरणे होती. दत्त जयंतीचे मुख्य सोहळे महंत श्री विलासानंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. महाआरतीला उपस्थित भक्तांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर' च्या मंत्रोच्चाराने वातावरण भक्तिपूरण झाले. शनिवारी भल्या पहाटेपासून मंदिरात भक्तांची वर्दळ पाहायला मिळाली. नामजप, आरती आणि महाप्रसादाच्या आयोजनेसाठी भाविकांची लगबग चालू होती. या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून मराठी भावगीत, भक्तिगीत आणि महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. श्री गुरुचर...
इमेज
  केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर  बीड , एमबी न्यूज वृत्तसेवा : केज तालुक्यातील मसाज येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात हलगरीचीपणा केल्याचा आरोप प्रशांत महाजन यांच्यावर करण्यात आला होता.. त्याच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात आली होती परंतु सध्या त्यांना स्वतःच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.. तर याच प्रकरणात पीएसआय पाटील यांना निलंबित करण्यात आलेले आहे सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.
इमेज
  श्री. बजरंगबली वेताळ मंदिर येथे आज श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे-श्री विलासानंदजी महाराज परळी/प्रतिनिधी येथील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 1 ते 5 वा. महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक प.पू.विलासानंदजी महाराज यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मित्ती मार्गशीर्ष शु.14 शके 1946 शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिरजवळील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 12 ते 1 वा. महाआरती, भजन, कीर्तन व दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या धार्मीक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री बजरंगबली वेताळ मंदिराचे संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन

इमेज
मांंडवा येथे आज प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव : पालखी सोहळा व काल्याचे कीर्तन मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) :-             तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिष पोर्णिमेला काळभैरवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी. परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आंध्रप्रदेशातील लभान समाजातील भाविक काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने  मोठ्या प्रमाणात हे भाविक यात्रोत्सवास आवर्जून उपस्थित राहतात.मांंडवा येथे उद्या (दि.१५) रोजी प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव असुन मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन मांडवा गावकऱ्यांनी केले आहे.       प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या  दि.१५ रोजी सकाळी ९ते ११ श्री  पारंपरिक पालखी मिरवणूक आणि मंदिर प्रदक्षिणा होईल व दु. १२ ते २ वाजता ह.भ.प विठ्ठल महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने यात्रोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमासाठी विविध श्रे...