इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन

मांंडवा येथे आज प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव : पालखी सोहळा व काल्याचे कीर्तन

मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन

परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) :-     

       तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिष पोर्णिमेला काळभैरवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी. परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आंध्रप्रदेशातील लभान समाजातील भाविक काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने  मोठ्या प्रमाणात हे भाविक यात्रोत्सवास आवर्जून उपस्थित राहतात.मांंडवा येथे उद्या (दि.१५) रोजी प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव असुन मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन मांडवा गावकऱ्यांनी केले आहे.

      प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या  दि.१५ रोजी सकाळी ९ते ११ श्री  पारंपरिक पालखी मिरवणूक आणि मंदिर प्रदक्षिणा होईल व दु. १२ ते २ वाजता ह.भ.प विठ्ठल महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने यात्रोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमासाठी विविध श्रेञातील मान्यवर व साधूसंतांची उपस्थिती लाभणार आहे. भाविकांनी भव्य यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मांडवा गावकऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या