
अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने मकरसंक्रांत निमित्त शॉपिंग स्टॉल महोत्सव बालाजी मंदिर अंबेवेस येथे ८ व ९ जानेवारी रोजी आयोजन परळी (प्रतिनिधी) मकरसंक्रांत निमित्त महिलांना आवश्यक असलेल्या वस्तुंची एकाच ठिकाणी खरेदी करता यावी, महिलांच्या व्यवसायाची वृध्दी व्हावी यासाठी परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने परळी शहरात मकरसंक्रांतीनिमीत्त नारीशक्ती शॉपिंग स्टॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या या महहोत्सवास परळी व परिसरातील महिलांनी भेट देवुन माफक दरातील वस्तू खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.हालगे यांनी केले आहे. परळी शहरातील अंबेवेस भागात असलेल्या बालाजी मंदिर येथे बुधवार दि.८ व गुरुवार दि.९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ६ या वेळेत या स्टॉलमधुन महिलांना मकरसंक्रांतीसाठी लागणारे वाण,गृहपयोगी साहित्याची खरेदी करता येणार आहे.यामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू,बाजारपेठेत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे वाण, चप्पल,साड्या,ज्वेलरी,कटलरी अशा सर्व वस्तू व तिळगुळ स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.मकरसंक्रा...