इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

पंकजाताईंना मिळाले भरभरून आशीर्वाद !

गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची ना.पंकजा मुंडेंनी घेतली भेट

उत्तम कामगिरीसाठी दोन्ही नेत्यांनी ना. पंकजाताईंना दिले भरभरून आशीर्वाद 


मुंबई।दिनांक ०६।

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची आज नवी दिल्लीत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन आभार मानले. यावेळी दोन्ही नेत्यांनी ना. पंकजाताईंना भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी भरभरून आशीर्वाद दिले.

 अमित शाह व राजनाथसिंह यांची आज पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंकजा मुंडेंनी आभार मानले, आभार म्हणून पंकजाताई यांनी महाराष्ट्राची आण-बाण व शान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक 'श्रीमान योगी' तसेच राष्ट्रसंत भगवान बाबा यांची मूर्ती भेट स्वरूपात दिली. याप्रसंगी अमित शाह व राजनाथसिंह यांनी पंकजाताईंना उत्तम काम करण्यासाठी आशीर्वाद दिले. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या