नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

महाराष्ट्रातील सर्व विषयांवर संपूर्ण सहकार्य करण्याचा पर्यावरण मंत्र्यांनी दिला शब्द

 ना.पंकजा मुंडेंनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट


महाराष्ट्रातील सर्व विषयांवर संपूर्ण सहकार्य करण्याचा पर्यावरण मंत्र्यांनी दिला शब्द 

मुंबई।दिनांक ०६।

राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. महाराष्ट्राचे  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र असलेले 'श्रीमानयोगी' पुस्तक यावेळी ना. पंकजाताईंनी त्यांना भेट स्वरूपात दिले.


   ना. पंकजाताई मुंडे आज दिल्ली दौर्‍यावर होत्या. दुपारी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कार्यालयास जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे जीवन चरित्र 'श्रीमानयोगी' भेट स्वरूपात दिले. अर्थात, छत्रपती शिवराय आपल्यासाठी आपला अभिमान आहेत आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे मार्गदर्शकही आहेत असं त्यांनी म्हटलं. यावेळी

सन्माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्रामधील सर्व विषयांवर संपूर्ण सहयोग करण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले असल्याचे ना. पंकजाताईंनी म्हटलं आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या