पोस्ट्स

इमेज
  व्हाईस चेअरमन रमेशराव कराड यांच्या हस्ते झालं वैद्यनाथ बँकेचे ध्वजारोहन परळी / प्रतिनिधी - 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्ता वैद्यनाथ बँकेचे ध्वजारोहण संपन्न झाले.सहकार क्षेत्रात नावाजलेली व संपुर्ण महाराष्ट्रात शाखा असलेली अग्रगण्य बँक म्हणून मागील 59 वर्षांपासून अविरतपणे ग्राहक सेवा देणारी बँक दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि. परळी-वै. च्या मुख्य कार्यालयात बँकेचे व्हाईस चेअरमन रमेशराव कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.  वैद्यनाथ बँक स्व. गोपीनाथराव मुंडे  यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र राज्याच्या पशु संवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि मा.खा.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरंतर प्रगती करत आहे.  76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बँकेच्या परळी-वै.येथील मुख्य कार्यालयात व्हाईस चेअरमन  रमेशराव कराड यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी बँकेचे संचालक माजी चेअरमन विकासराव डूबे,  नारायण सातपुते,  प्रकाश जोशी, महेश्वर निर्मळे,अनिल तांदळे, . प्रा.दासू वाघमारे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे  यांचेसह ब...
इमेज
  विविध मागण्याकरिता किसान सभेचे धरणे २७ रोजी आंदोलन  परळी / प्रतिनिधी... अखिल भारतीय किसान सभेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सोमवार दि 27 रोजी धरणे आंदोलन होणार असून आपल्या मूलभूत प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटी कडून करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घोषित केलेला हमीभाव आणि राज्य कृषी मूल्य आयोगाने शिफारशीत केलेला भाव यातील तफावत राज्य सरकारने अनुदान देऊन भरून काढावी, सोयाबीन व कापूस खरेदी केंद्रावरील होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी व शेतकऱ्यांचा सर्व शेतीमाल हमीभावाने खरेदी करावा, खरीप हंगाम २०२४ चे आलेले अतिवृष्टी चे अनुदान पी एम किसान, कृषी विभागाचा डेटा वापरून डी बी टी द्वारे देण्यात यावे. अनुदान यादीत नाव घालण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. तसेच कापूस सोयाबीन भावंतर अनुदान व आत्ताचे अतिवृष्टी अनुदान मोबाईल आधार लिंक नसणे मोबाईल नसणे तसेच बोटांचे ठसे न लागणे या कारणांमुळे ज्यांच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाहीत अशांची तोच व्यक्ती असल्याची खात्री करून त्यांना अनुदान देण्याची व्...
इमेज
प्रजासत्ताक दिन: अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखर येथे ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील, अंबाजोगाई कृ.उ.बा.समितीचे सभापती ॲड.राजेश्वरराव चव्हाण, केज कृ.उ.बा.समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, धारूर कृ.उ.बा.समितीचे उपसभापती सुनीलराव शिनगारे, बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक श्री.ॲड.प्रमोद जाधव, ॲड.लालासाहेब जगताप, ऋषिकेश आडसकर, गोविंदराव देशमुख, राजाभाऊ औताडे, जीवनराव कदम, अशोकराव गायकवाड, बालासाहेब सोळंके, विठ्ठलराव देशमुख, अनंतराव कातळे, लक्ष्मीकांत लाड, विजयराव शिनगारे, संभाजीराव इंगळे, मिनाज युसुफखाॅं पठाण, मधुकरराव शेरेकर, रमाकांतराव पिंगळे, अनिलराव किर्दंत, शशिका...
इमेज
  महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्कार: प.पु. गणेश्वर द्रविड शास्त्री पद्मश्री नवी दिल्ली (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील गणेशशास्त्री द्रविड त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार मि...

भीमनगरात आला आरतीच्या रूपाने पहिला लाल दिवा !

इमेज
  परळीच्या शिरपेचात राज्य सेवेचा मानाचा तुरा:हमालाची पोरगी राज्य अधिकारी! भीमनगरात आला आरतीच्या रूपाने पहिला लाल दिवा! परळी प्रतिनिधी :- परळी शहरातील अतिशय सामान्य कुटूंबातील मुलगी आरती बोकरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2023 दिली होती त्याचा निकाल नुकताच जाहिर झाला असून आरतीने त्या परीक्षेत यशस्वी गरुड झेप घेतली असून ती आता अन्न औषध या विभागात काम करणार असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे  आरती बोकरे ही परळी शहरातील भीमनगर मधील अतिशय सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील एक खाजगी दुकानात हमाल म्हणून काम करतात तर तिची आई ही महापारेषण वीज पुरवठा केंद्रात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते आशा परिस्थितीत तिने कोणत्याही प्रकारची क्लास ना कोणाचे मार्गदर्शन घेतले नाही फक्त आई वडील आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द मनाशी बाळगून अतिशय कष्टने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देण्याचं स्वप्न मनात ठेवून त्यावर मेहनत घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत होणाऱ्या परिक्षा 2023 वर्षात दिली आणि त्याचा निकाल आता नुकताच लागला असून तिने कुटूंबाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे तिने लोकस...
इमेज
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, उल्लेखनिय काम करणाऱ्या 3 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारनं आज पद्म पुसरस्करांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातअनोखे काम करणाऱ्यांच्या पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे या...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारत निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी 2025 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. नव्याने नोंदणी झालेल्या 18 वर्षाच्या वयोगटातील मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग करून घेणे. लोकशाही प्रक्रियेतील मतदान जनजागृती  हा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून  मतदारांसाठीची प्रतिज्ञा  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ए आर चव्हाण  यांनी सर्व प्राध्यापकांसमवेत दिली. हा कार्यक्रम परळी तहसीलमार्फत घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ. ए आर चव्हाण, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.पी एल कराड, उपप्राचार्य, डॉ.व्ही बी गायकवाड, प्रा. डी के आंधळे, प्रा. हरीश मुंडे, समन्वयक प्रा. उत्तम कांदे  यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.