पोस्ट्स

कडक धोरण: कडक कारवाई

इमेज
  सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द; शिक्षक आणि कर्मचारी सेवेतून बडतर्फ राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चर्चा झाली. यावेळी परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे ✅परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी तसेच पुरेसा बंदोबस्त ठेवावा ✅विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगण्यास मनाई ✅भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावे ✅संवेदनशील केंद्रांवर ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवावी ✅जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करावी ✅प्रत्येक तालुक्यात विशेष प्र...
इमेज
अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन गंगाखेड (प्रतिनिधी)श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोतर आमृत महोत्सव 375 वा वैकुंठ गमन सोहळा पित्यार्थ मौजे डोंगरजवळा ,माखणी ,डोंगरगाव व पंचक्रोशीच्या वतीने श्रीक्षेत्र गणेशपुरी देवस्थान डोंगरजवळा हे  पवित्र संजीवन समाधी असलेले प्राचीन देवस्थान आहे. डोंगराजवळा ,सिरसम, माखणी डोंगरगाव या गावाच्या शिवारात असलेल्या पवित्र डोंगरावर हे देवस्थान आहे इ.स पूर्वी 800 च्या समकाळातील श्री गणेश पुरी महाराज यांची संजीवन समाधी आहे इ.स.पूर्व 864 वा काल खंडातील श्रीमद आद्य माधवानंदपुरी महाराज यांची संजीवन समाधी महंत श्री मोहना नंदपुरी महाराज ,महंत श्री नागेश्वरपुरी महाराज, महंत श्री मनेंद्रपुरी महाराज ,महंत श्री राजे गोविंदजी महाराज,( दगडोबा महाराज) यांच्या सारख्या महान भगवत ,भक्त ,संत, महंत, योगी, ज्ञान ,कर्म भक्तीयोगाने पुनीत झालेल्या या तपोभुमीत महाशिवरात्रीच्या पूर्व काळातीवरती पंचक्रोशीतील समस्त गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.       ...
इमेज
महाशिवरात्र पर्व:अधिकृत माहिती नाही पण वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनातील बैठक वैद्यनाथ मंदिरात पार पडल्याची माहिती समोर! परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....         येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री पर्वावर देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात.या अनुषंगाने वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दोन तीन दिवस होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोयीसुविधा, यात्राकाळातील आवश्यक बाबी, प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा आदींची  पुर्वतयारी केली जाते.या अनुषंगाने आज  वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनातील बैठक वैद्यनाथ मंदिरात पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?,आवश्यक बाबी कोणत्या ? पूर्वतयारीचा नेमका काय आढावा झाला? याबाबत अद्याप जिल्हा प्रशासन अथवा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.मात्र वैद्यनाथ मंदिरात आज झालेली बैठक दरवर्षीप्रमाणेच  महाशिवरात्रीनिमित्तच झाली असण्या...

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
  ग्रामीण साहित्यातील पिंपळपान निखळले ------ ----- -------------------- ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे हे मराठी ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचे नाव . त्यांच्या साहित्यात ग्रामीण जीवनातील वास्तव, सामाजिक प्रश्न, नात्यागोत्यातील गुंफण आणि माणसांच्या भावनांचे चित्रण आढळते.त्यांनी साहित्याचे सर्वच प्रकार हाताळले. त्यांचे लोकप्रिय  कथासंग्रह; पेरणी (१९६२)  , मळणी (१९६७) ,कणसं आणि कडबा (१९७४) ,नातीगोती (१९७५) , बोळवण (१९७६), माळरान (१९७६),राखण (१९७७), हरिणी (२०००). त्यांच्या कादंबरी लेखनाने मराठी कादंबरी विश्व समृद्ध झाले आहे. यात पाचोळा (१९७१) , सावट (१९८७) , चारापाणी (१९९०)  ,आमदार सौभाग्यवती (१९८८) आमदार सौभाग्यवती कादंबरीचा नाट्याविष्कार प्रख्यात रंगकर्मी प्रा. कुमार देशमुख यांनी दिग्दर्शित केला होता. पाचोळा कादंबरीचे नाट्यरूपांतर व चित्रपट निर्मिती अंकुशराव कदम यांनी तर दिग्दर्शन महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील फिल्म विभागाचे प्रा.शिव कदम यांनी केले आहे. त्यांची अनुभव कथने वेगवेगळ्या धाटणीची आहेत.यात ग्रामीण साहित्य (१९९२), तिळा तिळा डिकी उघड (२००२), शेवटचा प्र...

दि.१३फेब्रुवारी रोजी आयोजन...

इमेज
  पाटोदा येथे शिवजन्मोत्सवा निमित्त मोफत आरोग्य तपासणी  व रक्तदान शिबीर पाटोदा /अमोल जोशी      शिवजन्मोत्सवा निमित्त पाटोदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.१३फेब्रुवारी रोजी  मोफत आरोग्य व औषध उपचार व रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन  आ.सुरेश धस यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक  थोरात राहणार आहेत.या शिबीरसाठी तज्ञ डॉक्टर्स सहभागी होत आहेत.          या शिबिरात हदयरोग तज्ञ डॉ.किरण सवासे,जनरल सर्जन डॉ.अभिषेक जाधव,नेत्र तज्ञ डॉ.चंद्रकांत वाघ,अस्थीरोग तज्ञ डॉ.अभिनव जाधव ,स्त्रीरोग तज्ञ डॉ.रूपाली सोळंके (जाधव) ,श्वसनविकार व अतिदक्षता तज्ञ डॉ.प्रशांत जाधव ,त्वचारोग तज्ञ डॉ.अनिल नागरगोजे ,मानसोपचार तज्ञ डॉ.अक्षय जाधव ,बालरोग तज्ञ डॉ.विशाल तांगडे ,स्त्रीरोग तज्ञ डॉ.पल्लवी तांदळे( बिनवडे) इत्यादी सहभागी होत आहेत.तरी  पाटोदा व परीसरातील गरजु रूग्णांनी याचा लाभ घ्यावा.     तसेच १४फेब्रुवारी रोजी शिवशाहीर डॉ.देवानंद माळी यांचे शिवशाह...

विद्यार्थ्यांकडून विविध कला गुण सादर

इमेज
  फिनिक्स इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात    पाटोदा/ अमोल जोशी......            शहरातील फिनिक्स इंग्लिश स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 10 फेब्रुवारी  रोजी  रेणुका माता मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   कर्नल कल्याणराव डोरले तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा दिपाली राजू जाधव , मुख्याध्यापक तुकाराम तुपे, कवियत्री सुरेखा खेडकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, नगरसेवक उमर चाऊस, मुख्याध्यापक जाधव एल. आर., घुमरे सर, हे उपस्थित होते.         कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून या स्नेहसंमेलाचे उद्घाटन करण्यात आले ,यावेळी  कर्नल डोरले साहेब यांनी शुभेछा पर मनोगत व्यक्त केले.  शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले विविध कला गुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी भक्ती गीते , लोकगीते, विविध वेशभूषा , विविध विषयावर विद्यार्थ्यांनी कला सादर केल्या कार्यक्रमास शहरातील नागरिक ,पालक , मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टेज...

अहिल्या गाठाळ यांचा सत्कार

इमेज
लीनेन्स क्लब आंबाजोगाईच्या स्तन कर्करोग महिला जागरण मोहिमेचा शुभारंभ अहिल्या गाठाळ यांचा लातुरात सत्कार  आंबाजोगाई-(वसुदेव शिंदे) :- लीनेन्स क्लब आंबाजोगाईच्या कॅन्सर विषयी महिला जागरण मोहिमेचा प्रारंभ लातूर येथे झालेल्या लीनेन्स क्लबच्या राज्य स्तरीय मेळाव्यात करण्यात आला. या प्रसंगी कॅन्सर पासून सुरक्षित राहण्याच्या सूचनांचे पत्रक प्रकाशित करण्यात आले. त्यात आंबाजोगाईच्या अर्चना स्वामी या कर्करोग ग्रस्त महिलेचे निवेदन आहे. लीनेन्स क्लबच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा शपथविधी, कॅबिनेट मिटिंग आणि पी.एस.टी. सेमिनार असा भरगच्च कार्यक्रम लातूर येथील वाडा हॉटेल येथे पार पडला. लीनेन्स डॉ मंजिरी कुलकर्णी व सुनीला नरपन्नवार यांची विशेष उपस्थिती होती. राज्यातील 29 क्लब्सचे पदाधिकारी उपस्थित होते. अहिल्या गाठाळ यांचा सत्कार माँ से बेटी सवाई हा लीनेन्स क्लबचा उपक्रम आहे. त्यात लीनेन्स क्लबच्या सदस्यांच्या  कर्तबगार कन्येचा सत्कार केला जातो. आंबाजोगाई लिलेन्स क्लबच्या कोषाध्यक्ष अयोध्या गाठाळ यांची कन्या, आंबाजोगाईची भूमीकन्या आणि लातूरच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांचा लीनेन्स ...