दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन

गंगाखेड (प्रतिनिधी)श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोतर आमृत महोत्सव 375 वा वैकुंठ गमन सोहळा पित्यार्थ मौजे डोंगरजवळा ,माखणी ,डोंगरगाव व पंचक्रोशीच्या वतीने श्रीक्षेत्र गणेशपुरी देवस्थान डोंगरजवळा हे  पवित्र संजीवन समाधी असलेले प्राचीन देवस्थान आहे. डोंगराजवळा ,सिरसम, माखणी डोंगरगाव या गावाच्या शिवारात असलेल्या पवित्र डोंगरावर हे देवस्थान आहे इ.स पूर्वी 800 च्या समकाळातील श्री गणेश पुरी महाराज यांची संजीवन समाधी आहे इ.स.पूर्व 864 वा काल खंडातील श्रीमद आद्य माधवानंदपुरी महाराज यांची संजीवन समाधी महंत श्री मोहना नंदपुरी महाराज ,महंत श्री नागेश्वरपुरी महाराज, महंत श्री मनेंद्रपुरी महाराज ,महंत श्री राजे गोविंदजी महाराज,( दगडोबा महाराज) यांच्या सारख्या महान भगवत ,भक्त ,संत, महंत, योगी, ज्ञान ,कर्म भक्तीयोगाने पुनीत झालेल्या या तपोभुमीत महाशिवरात्रीच्या पूर्व काळातीवरती पंचक्रोशीतील समस्त गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.           


         दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा भजन, सहा ते सात विष्णु सहस्त्रनाम, सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12:30 जगद्गुरु गाथा भजन ,एक ते चार भागवत कथा, चार ते पाच महाप्रसाद ,पाच ते सहा धूप आरती ,आठ ते दहा हरिकीर्तन, दहा ते बारा जागर,

  प्रारंभ शुक्रवार दि १४/२/२०२५. सांगता शुक्रवार दि २१/२/२०२५रोजी होणार आहे.भागवताचार्य ह भ प पंढरीनाथ महाराज शास्त्री वृंदावन धाम (संत शिवाई संस्थान श्रीक्षेत्र शिऊर) यांची भागवत कथा या कथेला संगीत साथ साहेबरावजी महाराज आळंदीकर ,साईनाथ महाराज कवडेकर, सागर महाराज बोंरडे, सुरेश महाराज शास्त्री जालना, कलस पूजन श्रीक्षेत्र उखळी बुद्रुक, उखळी खुर्द, ज्ञानेश्वरी पूजन ,श्री गणेशराव घरजाळे ,जवळा यांच्याकडून वाचकांना 108 ज्ञानेश्वरी ग्रंथराज भेट ,गाथा पूजन , कोद्री,डोंगर पिंपळा, ढेबेवाडी ,भागवत ग्रंथ पूजन सिरसम शे, डोंगरगाव, माखणी ,विना पूजन ,बडवणी पोखरणी वाळके, टाळ मृदंग पुजन खांदगाव, उंडेगाव, आंतरवेली.



 दैनंदिन कार्यक्रम वार  शुक्रवार दिनांक 14. 2. 2025 रोजी ह भ प महादेव महाराज राऊत बीड यांचे रात्र आठ ते दहा हरिकीर्तन,वार शनिवार दिनांक 15. 2. 2025 ह भ प व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी,वार रविवार दिनांक 16.2.2025 ह भ प उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची, वार सोमवार दिनांक 17.2.2025 रोजी चैतन्य महाराज देहूकर ,वार मंगळवार 18 .2 .2025 रोजी ह भ प चंद्रशेखर महाराज देगलूरकर,वार बुधवार 19 ,2.2015 ह भ प विजयानंद महाराज सुपेकर,वार गुरुवार 20 .2. 2025 रोजी ह भ प सागर महाराज उखळीकर, वार शुक्रवार 20 .2. 2025 रोजी हभप दादा महाराज दिग्रसकर ,वार शुक्रवार दि. 21 ह भ प गणेशानंद महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन होईल.

        या सप्ताह मध्ये महाप्रसाद सौजन्य मा .आमदार रत्नकररावजी गुटे साहेब, कथाकार महाराज सौजन्य   संतोष भाऊ मुरकुटे, सत्कार वस्त्र सौजन्य  लक्ष्मणराव मुंडे, विशेष उपस्थिती व सहकार्य आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब, संतोषभाऊ मुरकुटे मा .अध्यक्ष जिल्हा परिषद परभणी ,भगवानराव सानप संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी, रामप्रभू मुंडे माजी नगराध्यक्ष ,लक्ष्मणराव मुंडे सदस्य पंचायत समिती गंगाखेड ,नागनाथराव लटपटे सरपंच कोद्री ,सदिच्छा भेट -ह भ प राजेभाऊ महाराज आळंदी देवाची श्री (संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वंशपरंपरागत चोपदार),   ह भ प काका महाराज पंढरपूर, (श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा चोपदार) या कार्यक्रमास पंचक्रोशीतील उपस्थित राहणाऱ्या गावे खादगाव ,पोखरणी वाळखे ,खोकलेवाडी, चिलधरवाडी , बोर्डा, अंतरवेली, आनंद नगर ,कातकरवाडी, तांदुळवाडी ,पिंपळदरी, वाघदरी, ईसाद ,पिसेवाडी, शेंडगा,  मरळवाडी , दैठना,हरंगुळ,कड्याची वाडी, सेलमोहा, उंडेगाव, सावरगाव, महातपुरी, कासारवाडी ,हिवरा, मांडवा, मालेवाडी ,पारधवाडी, भिसेगाव, वैजवाडी ,लोकरवाडी, पडेगाव, बेलंबा , वाघबेट ,तळेगाव ,टोकवाडी, पांगरी, पिंपळगाव, हळम, हेळंब नखतवाडी आदी पंचक्रोशीतील असंख्य गावांची भजनी मंडळी  उपस्थिती लाभणार आहे.   पत्रिका सौजन्य - ओमकेश केंद्रे सरपंच सिरसम (शे)विणेकरी हरिभाऊ व्यंकटी रसाळ , ज्ञानोबा बिडगर, चोपदार भाऊसाहेब घरजाळे, माणिकराव सावंत, ज्ञानोबा मुंडे खांदगाव, या सप्ताहातील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य, मृदंगाचार्य यांची सात दिवस उपस्थिती लाभणार आहे तरी भाविकांनी  हरिनाम श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ह भ प गणेश महाराज उखळीकर (श्री संत केदारी महाराज संस्थान श्री क्षेत्र उखळी बुद्रुक) यांनी केले आहे. कार्यक्रमाचे स्थळ :श्री क्षेत्र गणेशपुरी मठ डोंगरजवळा मागणी डोंगरगाव सिरसम (शे) या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह भ प गणेश महाराज उखळीकर,आपले  संत चरण 108 श्री स्वामी परमेशरानंदजी  पुरी महाराज देवस्थान प्रमुख व सप्ताह समिती यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....