भूसंपादन मावेजा: आधी गाडी जप्त,आता थेट कैद चे आदेश

बीड न्यायालयचे आदेश: जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना कैद करा ! भूसंपादन मावेजा: आधी गाडी जप्त,आता थेट कैद चे आदेश बीड..... भूसंपादनाच्या मावेजासाठी आधीच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन न्यायालयाने जप्त केले असून आता थेट जिल्हाधिकारी बीड आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर श्रीमती एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. तसे वॉरंटचं न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध थेट काढल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची भूसंपादन मावेजाची अनेक प्रकरणे अनेक वर्षा पासून प्रलंबित आहेत . त्यासाठी शेतकरी येरझारा घालत असतात. न्यायालयाचा निवडा आल्यानंतरही भूसंपादन मावेजा दिला जात नसल्याचे देखील अनेक प्रकरणे आहेत. त्यातूनच काही दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन देखील न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता बीडच्या दिवाणी न्यायालयाने आणखी एक आदेश दिला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्त...