इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...
सचिन तेंडुलकरपेक्षा 'फास्टर' निघाला रोहित शर्मा; ९००० धावांसह सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात २० धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या खेळीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. पाक विरुद्धच्या हायहोल्टेज लढतीत रोहितनं  एक धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे पडला. आता सलामीवीराच्या रुपात सर्वात जलद ९००० धावा करण्याचा विक्रम  रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.
रोहित शर्मानं वनडेत आतापर्यंत २६२ डावात ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारताच्या डावाची सुरुवात करताना त्याने १८१ डावात ९ हजार धावांचा पल्ला  गाठला आहे. रोहितशिवाय वनडेत सलामीला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये बाबतीत  सचिन-गांगुली हे दोनच फलंदाज हिटमॅनच्या पुढे आहेत.या दिग्गजांच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

 ३७ वर्षीय रोहित शर्मा वनडेत सलामीवीराच्या रुपात ९००० धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेट जगतातील सहावा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर (१५३१०), सनथ जयसूर्या (१२७४०), ख्रिस गेल (१०१७९), एडम गिलख्रिस्ट (९२००) आणि सौरव गांगुली (९१४६) यांच्या क्लबमध्ये त्याने एन्ट्री मारली आहे.

ओपनरच्या रुपात सर्वात जलदगतीने ९ हजार धावा करणारे फलंदाज

रोहित शर्मा (१८१ डाव)
सचिन तेंडुलकर (१९७ डाव)
सौरव गांगुली (२३१ डाव)
ख्रिस गेल (२४६ डाव)
एडम गिलख्रिस्ट (२५३ डाव)
सनथ जयसूर्या (२६८ डाव)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या