पोस्ट्स

इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल !

इमेज
पशूसंवर्धन विभागाचे काम अधिक गतीमान करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल पशुधन विकास अधिकाऱ्यांची 2795 पदे भरणार मुंबई, दि. 8 – पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.  ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृती बंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण 4684 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत 1886 पदे भरलेली असून 2798 पदे रिक्त आहेत. तसेच 31 डिसेंबर 2025 अखेर 8 पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्...
इमेज
दोघा सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून आवदाच्या पवन चक्कीचे १३ लाख रु चे साहित्याची चोरी केज :- पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून पवन चक्कीचे सुमारे १३ लाख रु. किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा येथे आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीचे पवनचक्की उभारणीचे काम सुर आहे.  दि. ८ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे २:३० वा. च्या सुमारास पवन चक्की उभारणीच्या कामावर काम करीत असलेले सुरक्षा रक्षक तेथे झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांना त्यांच्या चादर फाडून त्याने हातपाय बांधले आणि पवन चक्कीचे केबल व इत्तर साहित्य चोरून नेले आहे.  या प्रकरणी सुरक्षारक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांनी साहित्य चोरीची माहिती आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या नुसार अधिकाऱ्यांच्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इमेज
गुरुसेवेचा भाव सदैव स्थिर असला पाहिजे, त्यात अस्थिरता आली तर साधकाची साधना फळाला येत नाही- प.पू. मकरंद महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        गुरुतत्त्वाचा बोध घ्यायचा असेल तर सेवावृत्ती धारण करावी लागते. जोपर्यंत गुरुचरणी 'सेवेलागी सेवक झालो' या न्यायाने आपण लीन होत नाही तोपर्यंत गुरुकृपा प्राप्त होत नाही. गुरुप्रती असलेला सेवाभाव स्थिर असला पाहिजे. तो भाव अस्थिर झाला तर साधकाला प्राप्त होणारी साधनेची फलश्रुती मिळत नाही असे प्रतिपादन  दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी केले.      बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळा होत आहे.त्याचबरोबर दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांच्या रसाळ वाणीतून सायंकाळ सत्रामध्ये गुरुचरित्र कथामृतही ऐकायला मिळत आहे. आज दुसऱ्या दिवशीच्या कथामृत सोहळ्यात गुरु महिमा विशद करताना प.पू. मकरंद महाराज यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून गुरुचरित्र साराचे विवेचन केले. ग...
इमेज
यादवकालीन सकलेश्वर (बाराखांबी) महादेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश अंबाजोगाई : येथील १२व्या शतकातील यादवकालीन सकलेश्वर (बाराखांबी) महादेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.            आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मंदिराच्या ९,७३७चौ. मी. परिसरातील १९२ चौ. मी. भाग संरक्षित म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिराचे जतन व संवर्धन होणार असून, पर्यटनालाही चालना मिळणार आहे. मंदिराच्या ऐतिहासिक आणि यदृष्ट्या महत्त्वामुळे स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे..

वैद्यनाथ मंदिर येथे अजुन तीन दिवस धार्मिक पर्वणी.....

इमेज
परळीत श्रीगुरुचरित्र सारामृत पारायणाला उत्साहात प्रारंभ: मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग 'गुरुचरित्र' हे चरित्र आणि धर्माधिष्ठित चारित्र्य घडवते -प.पू. मकरंद महाराज दत्तधाम परभणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगुरुचरित्र सारामृत पारायण व श्रीगुरुचरित्र कथामृत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यास आज (दि.७) रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या पारायणास मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.गुरुचरित्र हे चरित्र आणि धर्माधिष्ठित चारित्र्य घडवते  असे प्रतिपादन प.पू. मकरंद महाराज दत्तधाम परभणी यांनी केले.       परळी वैजनाथ जवळील डोंगरतुकाई हे जाज्वल्य ठिकाण आहे.या मंदिरात गुहेत साधारणत: चार ते पाच पायऱ्या उतरून गेल्यावर खाली तळघर लागते. तळघर साधारणत: पाच फूट लांबी रुंदीचे आहे. याच गुहेत श्री.दत्तात्रय अवतार प.पू.श्री. श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (गाणगापूर)  हे याच गुहेत एक वर्ष वास्तव्यास राहिले होते. या अनुषंगानेच परळी वैजनाथ पवित्र नगरीमध्ये श्री...
इमेज
सरस्वती नदी अतिक्रमण:मंत्री पंकजा मुंडे यांनी कान उघडणी केल्यानंतर नगरपरिषदने २५ जणांना बजावल्या नोटीसा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळी शहरातील पुरातन नदी असलेल्या सरस्वती नदीवर अनाधिकृत प्रचंड अतिक्रमणे झालेले असून या नदीपात्रात भराव टाकून व अनाधिकृत खोदकाम करून या नदीवरच चढाई करण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब पंकजा मुंडे यांनी गांभीर्याने घेत न.प. प्रशासनाची कानउघडण केली होती. त्याच प्रमाणे स्वतः या घटनास्थळी जाऊन प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता न.प. प्रशासन खडबडून जागे झाले असून 25 जणांना नगरपरिषदेने नोटीसा बजावल्या आहेत.  नदीतील अतिक्रमणे स्वतःहून न काढल्यास नप प्रशासन करणार कायदेशीर कारवाई असल्याची मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी माहिती दिली.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील सरस्वती नदीत होत असलेल्या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत त्याची पाहणी केली होती.परळीच्या जुन्या गावातून वाहत असलेल्या सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्याच्या होत असलेल्या कामाबद्दल मंत्री मुंडे यांनी पालिका प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर आता प...
इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन परळी / प्रतिनिधी  महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी परळीत एक वही एक पेन या अभिनव अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक पत्रकार विकास वाघमारे व विकास रोडे यांनी दिली आहे . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . आणि ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालना मिळावी या हेतूने एक वही एक पेन हा उपक्रम १४ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी ९ ते १ या वेळेत राबविण्यात येणार आहे. अवांतर खर्च न करता या समाजोपयोगी अभियानात सहभागी होऊन सकाळी ९ ते १ या वेळेत आपण वही पेन आणून द्याव्यात जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना एक वही एक पेन घेऊन यावे असे आवाहन पत्रकार विकास वाघमारे यांनी केले आहे या वेळी या अभियानाचे संस्थापक विकास रोडे ही उपस्थि...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!