पुण्यस्मरण .......!

स्मृ.आबाजीराव तायडे: समर्पित भीमगायक व गुणवंत तंत्रज्ञ म हात्मा बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचारांचा वारसा जनमानसात पोहोचवणारे निष्ठावान आंबेडकरी लोकगायक आणि महापारेषणचे कर्तव्यदक्ष,गुणवंत सेवानिवृत्त तंत्रज्ञ आदरणीय आबाजीराव तायडे (अण्णा) यांचा २९ एप्रिल हा स्मृतिदिन! या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा आणि एका प्रेरणादायी जीवनप्रवासाचा कृतज्ञतापूर्वक आढावा घेणे म्हणजे एका समृद्ध पर्वाचे स्मरण करणे आहे . महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाच्या इतिहासात अनेक तेजस्वी व्यक्तींनी आपल्या कार्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच परंपरेतील एक आदरणीय नाव म्हणजे आबाजीराव तायडे. त्यांनी १९६५ साली 'समाज सुधारक गायन मंडळ' स्थापन करून आपल्या प्रभावी गायकीच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन परभणी जिल्ह्यातील आंगलगाव येथे लोकगायक आबाजी मेसाजी तायडे यांच्यासह यादव कांबळे,...