युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

गायींना गुंगीचे औषध देणाऱ्यांना तात्काळ अटक करा !

परळीतील 'त्या' संतापजनक प्रकाराची ना. पंकजा मुंडेंनी घेतली दखल

गायींना गुंगीचे औषध देणाऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना

परळी वैजनाथ।दिनांक २५।

गायींना गुंगीचे औषध देऊन त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसल्याचा प्रकार शहरात घडल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करावी अशा सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.

संदर्भिय सविस्तर बातमी:■ *खळबळजनक व संताप आणणारी घटना: गाडी घेऊन आले, मध्यरात्रीनंतर गाईंना खाऊ घातल्या गुंगीच्या गोळ्या आणि डांबून घेऊन जाण्याचा प्रयत्न!

    शहरातील स्नेहनगर भागात काल रात्री गायींना खाण्याच्या पदार्थांमधून औषध देण्याचा संतापजनक प्रकार घडला. गायींना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न होता असा संशय स्थानिक रहिवाशांना आला, त्यांनी सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडला. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक व स्थानिक पोलिस निरीक्षक यांना संपर्क साधून या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.  गुंगीचे औषध मिश्रित पदार्थ खाल्याने ज्या गायी बाधित झाल्या होत्या त्यावर त्वरेने उपचार करण्यास त्यांनी सांगितल्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी उपचार करून चार   गायींना धोक्यात बाहेर काढले, एका गायीवर उपचार सुरू आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या