शासकीय शिष्टाचारात होणार अंत्यसंस्कार!

दिवंगत आर .टी.देशमुखांच्या पार्थिवावर उद्या परळीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार तहसीलच्या पाठीमागील आर.टी. देशमुखांच्या निवासस्थानाजवळ होणार अंत्यसंस्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे तहसीलच्या पाठीमागे त्यांच्या निवासस्थानाजवळ शासकीय शिष्टाचारात उद्या दिनांक 28 रोजी सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं काल अपघाती निधन झालं.लातूर-सोलापूर महामार्गावर पाणी साचले आणि पाणी उडून काचेवर आले. यामुळे चालकास समोरचे काही दिसले नाही. अचानक ब्रेक लावला. यामुळे गाडी घसरत जाऊन पलटी झाली. गाडीने चार पलट्या खाल्ल्या. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. यामध्ये माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं काल अपघाती निधन झालं. परळीत उद्या शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार दरम्यान, दिवंगत आर .टी.देशमुखांच्या पार्थिवावर परळीत उद्या बुध...