इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

शासकीय शिष्टाचारात होणार अंत्यसंस्कार!

दिवंगत आर .टी.देशमुखांच्या पार्थिवावर उद्या परळीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार

तहसीलच्या पाठीमागील आर.टी. देशमुखांच्या निवासस्थानाजवळ होणार अंत्यसंस्कार 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे तहसीलच्या पाठीमागे त्यांच्या निवासस्थानाजवळ शासकीय शिष्टाचारात उद्या दिनांक 28 रोजी सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

         दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं काल अपघाती निधन झालं.लातूर-सोलापूर महामार्गावर पाणी साचले आणि पाणी उडून काचेवर आले. यामुळे चालकास समोरचे काही दिसले नाही. अचानक ब्रेक लावला. यामुळे गाडी घसरत जाऊन पलटी झाली. गाडीने चार पलट्या खाल्ल्या. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. यामध्ये माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं काल अपघाती निधन झालं.

परळीत उद्या शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार 

      दरम्यान,  दिवंगत आर .टी.देशमुखांच्या पार्थिवावर परळीत उद्या बुधवार दि.२८ रोजी सकाळी ११.०० वा.तहसीलच्या पाठीमागील आर.टी. देशमुखांच्या निवासस्थानाजवळ  शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या