आर. टी. देशमुख यांच्या गाडीचा नेमका अपघात कसा घडला? चालकाने काय सांगितलं?
BJP Leader R T Deshmukh Death : भाजप नेते आर. टी. देशमुख यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याची माहिती आता समोर आली आहे. या अपघातात त्यांच्या गाडीचा चालक बचावला आहे. त्याने हा अपघात नेमका कसा घडला याबाबत माहिती दिली आहे.
लातूर : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं आज अपघाती निधन झालं. अपघात नेमका कसा झाला? याबाबत वाहन चालकाने माहिती दिली आहे. लातूर-सोलापूर महामार्गावर पाणी साचले आणि पाणी उडून काचेवर आले. यामुळे चालकास समोरचे काही दिसले नाही. अचानक ब्रेक लावला. यामुळे गाडी घसरत जाऊन पलटी झाली. गाडीने चार पलट्या खाल्ल्या. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला, अशी माहिती चालकाने दिली. या अपघातात माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला नेले जात होते. पण या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. आर. टी. देशमुख यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीला लातूर-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला. या अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
कसा झाला अपघात?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलावरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली. त्यात माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला. या घटनेत गाडीत असलेला वाहनचालक मात्र बचावला आहे. त्याच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे. महामार्गावरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचलं होतं. वेगात असलेल्या गाडीच्या समोरील काचेवर पावसाचे पाणी आले. त्यामुळे वाहन चालकास अंदाज लागला नाही. वेगात असलेल्या गाडीला ब्रेक लावला. यात गाडी स्लीप झाली. गाडीने चार पलटी खाल्ल्या.या अपघातात वाहन चालकाच्या बाजूला बसलेले माजी आमदार आर. टी. देशमुख यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. माजी आमदार आर. टी. देशमुख यांना उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा