पोस्ट्स

माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक

इमेज
चाकरवाडीतील शिवमहापुराण कथेला ना. पंकजा मुंडेंची भेट ; कथा श्रवणासोबत आरतीत घेतला सहभाग माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक केज ।।दिनांक ०८। विसाव्या शतकातील महान संत, ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त चाकरवाडीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा सोहळ्याला आज प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री  पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन, कथाश्रवण व शिवमहापुराण कथेच्या आरतीत  सहभाग घेतला.         ना.पंकजाताई मुंडे यांनी या दिव्य सोहळ्याला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले, तसेच पं. प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी शैलीतील शिवमहापुराण कथेतील आरतीत सहभागी होत, हजारो भाविकांबरोबर भक्तिभावाने या वातावरणात रममाण झाल्या.या वेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी पंकजाताईंचे या सोहळ्यात औपचारिक स्वागत केले. २० व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर  महाराजांच्या विचारांचे स्मरण करताना पंकजाताईंनी सांगितले की, बीड जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक आणि अ...

आर.टी. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा

इमेज
स्व.आर.टी. जिजा संयम आणि निष्ठेचे प्रतिक होते -पंकजा मुंडे गंगापूजन कार्यक्रमात ना.पंकजा मुंडे यांनी दिला आर.टी. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा परळी वैजनाथ।दिनांक०८।  माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या गोडजेवण कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात त्यांनी देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.      ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, संयम, निष्ठा, प्रेम आणि जिव्हाळा म्हणजेच आर.टी. देशमुख जिजा होते.  त्यांच्या अचानक निधनाने मला मोठा धक्का बसला. ते केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर माझ्यासाठी एक भावनिक आधार होते. मी अनेक वेळा अडचणीत असताना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही चिंता दिसली नाही. अत्यंत शांत, संयमी आणि आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही, ही खूप मोठी पोकळी आहे.     यानिमित्त  हभप यशवंत महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. त्यांनी ‘कर्तव्यनिष्ठ जीवनाची प्रेरणा’ या विषयावर भावस्पर्शी कीर्तन सादर केलं. की...

नेमकं आहे कुठे नगरपरिषद प्रशासन?- अश्विन मोगरकर

इमेज
बदलत्या हवामानात डासांचा स्फोट, परळीतील नागरिक त्रस्त! नगरपरिषदेच्या दिरंगाईचा धोका -आरोग्यावर; फवारणी कुठे? परळी, ता. ८ जून २०२५ — सध्या परळी शहरात डास व माश्यांचा प्रचंड प्रादुर्भाव पाहायला मिळत असून, त्यामुळे संपूर्ण शहरभर व्हायरल इन्फेक्शनचा उद्रेक झाला आहे. शहरातील जवळपास प्रत्येक घरात एक तरी सदस्य आजारी पडलेला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला हे आजारपणाने त्रस्त झाले आहेत. परळी शहरात मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून नदी-नाले व गटारांची सफाई नियमितपणे होणे अपेक्षित असताना, नगरपरिषदेने अद्याप कुठलीच ठोस पावले उचललेली नाहीत. परिणामी अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचले असून, तिथे डासांच्या पैदाशीला पोषक वातावरण तयार झाले आहे. डासांचा त्रास मोठ्या प्रमाणावर:        गणेशपार,भीमनगर,बंगला गल्ली, अंबेवेस, मोंढा,विद्यानगर या भागांतील रहिवाशांकडून सतत तक्रारी येत असून, रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे तर दूरच, घरातही डासांपासून सुटका नाही. माश्यांमुळे अन्न दूषित होत असून, त्यामुळे पोटाचे आजार वाढले आहेत. यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रांमध्ये जावे लागत असून,...

विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.....

इमेज
अकरावी प्रवेश प्रक्रिया – नवीन सूचना जाहीर, नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! परळी वैजनाथ, ५ जून २०२५ – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची आणि दिलासादायक सूचना जाहीर करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही किंवा अर्ज अर्धवट राहिला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टपणे कळवले आहे की, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी काही अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 🔹 भाग १ लॉक करून भाग २ बाकी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी: ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून भाग १ लॉक केला आहे, पण भाग २ अद्याप भरलेला नाही किंवा लॉक केलेला नाही , अशा विद्यार्थ्यांना आता दुसरी संधी दिली जात आहे. ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून २०२५ दुपारी १२:३० या कालावधीत या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम अर्जाचा भाग २ भरून लॉक करता येणार आहे. मात्र, आधीच भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना या कालावधीत पसंतीक्रमात कोणताही बदल करता येणार नाही. 🔹 नोंदणी न केलेल्या किंवा अर्धवट अर्ज असलेल्या विद्या...

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
ह.भ.प. अमृताश्रम स्वामी महाराज यांना कीर्तन महर्षी पुरस्कार बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीचे भूमिपुत्र तथा बीड जिल्ह्याचे आध्यात्मिक वैभव अमृताश्रम स्वामी (अमृत महाराज जोशी ) यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.        शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे समाज प्रबोधनासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात करण्यात आले होते,यामध्ये महाराष्ट्रातील चार दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन झाली आहेत. त्यांत महाराष्ट्रातील जेष्ठ कीर्तनकार तथा संत साहित्याचे अभ्यासक अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी ) यांना यंदाचा कीर्तन महर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी याबाबत माहिती दिलीयं. या कार्यक्रमास शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प. राजेंद्र महाराज येप्रे तथा येप्रे साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ नरेगाव पुणे यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे.. या वेळी अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते ,प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्...

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळा: बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना "माऊली सेवा समर्पण पुरस्कार" जाहीर परळी वैजनाथ, जि. बीड (प्रतिनिधी) – अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने २१ व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना  "माऊलीसेवा समर्पण पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.         सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, निस्वार्थी सेवा आणि समर्पण वृत्ती याची दखल घेत अ.भा. वारकरी मंडळाने यावर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची  निवड केली असल्याचे अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सांगितले आहे.श्री. धर्माधिकारी यांचे कार्य समाजासाठी एक दीपस्तंभ ठरलेले आहे. त्यांनी दाखवलेला सेवाभाव आणि सातत्यपूर्ण प्रयत्न प्रेरणादायी आहेत.हा पुरस्कार संत सेवा, समाजकार्य आणि भक्तिपंथातील सेवा,समर्पण व योगदानासाठी दिला जात असुन, यंदा पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यान...

समतोल: उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी हाताळला प्रश्न !

इमेज
परळीतील उड्डाणपूल दुरुस्तीची कामे आणि वाहतूक व्यवस्थापनाचा साधला समतोल – प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय परळी वैजनाथ – परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी प्रश्न हाताळला.पार  पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत या कामांबाबतचा कार्य आराखडा तयार करण्यात आला असुन, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचे ठरवण्यात आले आहे. वाहतूक सुरु ठेवण्यावर भर... परळीतील हा उड्डाणपूल म्हणजेच शहरात येण्यासाठीचा मुख्य प्रवेशद्वार आहे. शहरातील आणि परराज्यातील अनेक भागांतील वाहतूक या पुलावरून होते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामांदरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे शक्य नसल्याने, कामे ही मध्यरात्रीच्या सुमारास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, दिवसाच्या वेळात सामान्य वाहनचालकांना फारसा त्रास होणार नाही. जड वाहतुकीसाठी बायपास मार्ग दुरुस्तीच्या कामादरम्यान जड ...