पोस्ट्स

MB NEWS- हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
  उपमुख्याध्यापक अरुण कांबळे यांना पीएच.डी.  बीड: केज तालुक्यातील शिंगणी येथील मूळ रहिवासी तथा छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक अरुण लक्ष्मणराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'महात्मा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा' या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली .डॉ. डी. व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'डॉ.बाबसाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन: एक अभ्यास (1920 ते 1970 )' या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला आहे. अरुण कांबळे हे गेल्या 33 वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. ते इंग्रजी विषयाचे  राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक , लसाकम या सामाजिक संघटनेचे  राज्य प्रवक्ते आहेत . त्यांचा अनिगुत काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे . मासिक लहूशक्ती, मासिक तथागत चे  त्यांनी अनेक वर्ष  संपादन केले आहे .विविध विषयांवर अनेक वर्तमानपत्रातून  त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.   स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून आय.एस.टी. म्हणून  ते जपान  ये...
इमेज
ना.पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा सामाजिक सेवा सप्ताह २१ ते २७ जुलै  दरम्यान  विविध सामाजिक उपक्रम; सेवा सप्ताहाचे उद्या उदघाटन परळी वैजनाथ,।दिनांक २०। राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल, पशुसंवर्धन,मंत्री तथा जालना जिल्ह्ययाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे  यांच्या वाढदिवसा निमित २१ ते २६ जुलै दरम्यान शहरात सामाजिक सेवा सप्ताह राबविण्यात येणार असून या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उदघाटन उद्या सोमवारी होत असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.    २१ तारखेला सकाळी ११ वा. ना. पंकजा मुंडे यांच्या अरुणोदय मार्केट मधील संपर्क कार्यालयात सेवा सप्ताहातील उपक्रमांचे उदघाटन होणार आहे. असा असणार सामाजिक सेवा सप्ताह ----------- २१ ते २७ जुलै - आधार कार्ड अपडेट,प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन २.० घरकुल नोंदणी  बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना नोंदणी स्थळ : पंकजाताई यांचे संपर्क कार्यालय, परळी वै.,ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी- स्थळ : उपजिल...

प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेरनिवड!

इमेज
परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकरिणी: विद्यमान 'शिलेदारांच्याच' फेरनिवडी  विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, वैजनाथ सोळंके तालुकाध्यक्ष तर बाजीराव भैय्या धर्माधिकारी शहराध्यक्ष बीड (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी विधानसभा अध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे विश्वासू गोविंद देशमुख यांची आज पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वैजनाथ सोळंके व शहराध्यक्षपदी बाजीराव भैया धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज बीड येथे संपन्न झालेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्याच्या दरम्यान सदर नियुक्तीची पत्रे खासदार सुनील तटकरे तसेच माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर ही पदे रिक्त होती. दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता धनंजय मुंडे यांच्या टीम मधील त्यांचे विश्वासू...

गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे

इमेज
  ज्ञाती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड:आवेदन पत्र सादर करा गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे  गेवराई ( प्रतिनिधी ) दरवर्षी प्रमाणे शुक्ल यजुर्वेदीय मांध्यदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे व शुक्ल यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड संयुक्त विद्यमाने पारितोषिक अर्ज संस्थेकडे मागविण्यात येत आहेत.  पारितोषक १0 व१२ वी पदवी, पदविका व उच्च पदवी धारकांना गुणाक्रमाने दिले जाते त्यासाठी अर्जाची प्रिंट विद्यार्थ्यांना द्यावी व बीड जिल्हा सही शिक्क्याने पुणे कार्यालयाकडे पाठवावीत तसेच परतफेड शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.  नियम :- शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी ती परत करावयाची आहे. अर्जाची किंमत फक्त रु १00 सर्व कागदपत्र पूर्ण करून अर्ज स्टॅम्प पेपर आम्ही पत्रासहित शाखेच्या सही शिक्क्याने मध्यवर्ती कडे पाठवावा.     वरील शिष्यवृत्तीसाठी ज्ञाती समाज बांधव गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेकडे अर्ज सादर करावेत. सर्वांनी संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. 30 जुलै 2025 पर्यंत अर्ज संस्थेकडे द्यावेत याचा ...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त....

इमेज
  रविवारी पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन - डॉ.राजेश इंगोले ======================= अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )     राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी  अंबाजोगाई तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी मराठी पत्रकार परिषद वैद्यकीय कक्ष व राजकिशोर पापा मोदी  मित्र मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आसुन  या आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय कक्ष प्रमुख सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले व राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.      शहरातील समाधान मानसोपचार रूग्णालय व व्यसनमुक्ती केंद्र व नेत्रालय, हाऊसिंग सोसायटी, पंचायत समिती जवळ, अंबाजोगाई या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत अंबाजोगाईत या भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात ...
इमेज
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे  आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात   परळी (प्रतिनिधी ) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने वार शनिवार दिनांक 19/7/2025/ रोजी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते.                            दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धे च्या निमित्ताने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत1) पी टी उषा हाऊस 2)  कर्मन मल्लेश्वरी 3) मिल्खा सिंग 4 ) मेजर ध्यानचंद हाऊस या सर्व हाऊस मधील मुलांनी उस्फुर्त सहभाग घेतला यात इयत्ता  पहिली ते दहावीच्या मुलांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा शिक्षक कुमारी संघमित्रा हुमने मॅडम ,राजु कलावत, भरत हएलओर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.               या स्पर्धा आयोजित क...
इमेज
 पं.यादवराज फड यांना स्वरब्रह्म पुरस्कार जाहिर  अंबाजोगाई :  तालुक्यातील वरवटी येथील पंडित यादवराज फड यांना स्वरब्रह्म संगीत पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वरब्रह्म कला अकादमीच्या वतीने घेण्यात येणारा यंदाचा स्वरब्रह्म संगीत महोत्सव धायरी,पुणे येथे  होणार आहे. या महोत्सवात स्वरब्रह्म कला अकादमीच्या पन्नासहून अधिक विद्यार्थी कलाकार आपले गायन - वादन सादर करणार आहेत. यानिमित्ताने किराणा घराण्याचे जेष्ठ गायक व संगीतकार पं. यादवराज फड, जेष्ठ किर्तनकार व गायक-वादक ह.भ.प.भास्कर महाराज सानप, नाना पानसे घराण्याचे युवा पखावज वादक कृष्णा साळुंके व युवा गायक गोविंद कांबळे यांना स्वरब्रह्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.11 हजार रू. रोख,सन्मानचिन्ह ,शाल   श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पं. यादवराज फड यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार असुन रसिक, कलाकार व मान्यवर मंडळी या महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. धायरी येथील कै.बंडोजी खंडोजी चव्हाण हायस्कुल सभागृह येथे रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत महोत्सव संपन्न होणार असुन पुणे व परिसरा...