दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे

 ज्ञाती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड:आवेदन पत्र सादर करा


गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे 

गेवराई ( प्रतिनिधी ) दरवर्षी प्रमाणे शुक्ल यजुर्वेदीय मांध्यदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे व शुक्ल यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड संयुक्त विद्यमाने पारितोषिक अर्ज संस्थेकडे मागविण्यात येत आहेत. 

पारितोषक १0 व१२ वी पदवी, पदविका व उच्च पदवी धारकांना गुणाक्रमाने दिले जाते त्यासाठी अर्जाची प्रिंट विद्यार्थ्यांना द्यावी व बीड जिल्हा सही शिक्क्याने पुणे कार्यालयाकडे पाठवावीत तसेच परतफेड शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. 

नियम :- शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी ती परत करावयाची आहे. अर्जाची किंमत फक्त रु १00 सर्व कागदपत्र पूर्ण करून अर्ज स्टॅम्प पेपर आम्ही पत्रासहित शाखेच्या सही शिक्क्याने मध्यवर्ती कडे पाठवावा.  

  वरील शिष्यवृत्तीसाठी ज्ञाती समाज बांधव गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेकडे अर्ज सादर करावेत. सर्वांनी संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. 30 जुलै 2025 पर्यंत अर्ज संस्थेकडे द्यावेत याचा लाभ घ्यावा असे शुक्ल यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था अध्यक्ष अॅड कालिदास थिगळे, सचिव प्रा. विवेक वैद्य उपाध्यक्ष सीडी देशमुख दिलीप खिस्ती अनिल बोर्डे मोहनराव राजहंस जगन्नाथराव जोशी गणेश रामदासी व यशवंत( बंडू) सुलाखे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....