पोस्ट्स

इमेज
काव्य महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात साजरा   अंबाजोगाई ( प्रतिनिधी )   अंबाजोगाई येथील काव्य महिला महाविद्यालय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.      महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य करुणा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.  ध्वजारोहण नंतर काव्य महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष जयंत करपे यांनी स्वतंत्र दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,प्राचार्य देशमुख यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान संदेश दिला.       यावेळी प्राचार्य करुणा देशमुख प्रा, शशिकांत रहाडे ,फॅशन डिझाईनच्या शीला होके मॅडम पूजा नरवडे मॅडम आदमाने मॅडम गायत्री लोहिया मानसी मुळे पल्लवी गायकवाड मॅडम स्नेहल शिंदे किर्तन मॅडम संगणक विभागाच्या प्रमुख ऋतुजा शिंदे मॅडम कॉलेजचे ग्रंथपाल शिवाजी जाचक सर हे उपस्थित होते
इमेज
शहरातील उघड्या गटारी, खड्ड्यामुळे अपघात, नगरपरिषदेने त्वरित खड्डे बुजवून घ्यावेत- अश्विन मोगरकर परळी वैजनाथ,प्रतिनिधी... मोंढा मार्केट येथे उघड्या व्हॉल्व्ह च्या खड्ड्यात चारचाकी गाडीचे चाक फसल्याने परळी नगरपरिषदेचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे. गणेशपार येथील नालीही मागील दीड महिन्यांपासून खोदून ठेवल्याने अपघाताची शक्यता आहे. परळी नगरपरिषदेकडून आवश्यक कामाकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप भाजपा सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी केला आहे.  परळी शहरात कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी आला आहे. रस्ते, नाली, भूमिगत गटार अश्या विविध विकास कामामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याऐवजी नगरपरिषदेच्या आंधळ्या कारभाराचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. शनिवार, दि 16 ऑगस्ट रोजी सकाळी मोंढा मार्केट मधील टेलर लाईन जवळ उघड्या स्थितीत असलेल्या व्हॉल्व्ह च्या खड्ड्यात चारचाकी वाहनाचे पुढील चाक गेल्याने अपघात झाला. यात गाडीचे नुकसान झाले मात्र सुदैवाने चालकाला कुठलीही दुखापत झाली नाही. यापूर्वीही अनेक नागरिक व  वाहने या उघड्या खड्ड्यात पडली आहेत. नगरपरिषदेकडे या भागातील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा सांगूनही ...

संभाजीनगर परळी वैजनाथ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

इमेज
चोरीप्रकरणी एक अटकेत; सोन्याचा गोपसहित 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत  संभाजीनगर परळी वैजनाथ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी वैजनाथ  बसस्थानक येथे गळ्यातील सोन्याचा गोप चोरीला गेल्याच्या घटनेचा छडा लावत संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने एकास अटक करत 25 ग्रॅम वजनाचा, अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीचा सोन्याचा गोप हस्तगत केला. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.           दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.55 वाजता, फिर्यादी नाथराव माणिकराव फड (वय 67, रा. शंकर पार्वती नगर, परळी वै.) हे अंबाजोगाईला जाण्यासाठी परळी बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोप अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी फिर्यादीने 14 ऑगस्ट रोजी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गु.र.नं. 164/2025 भादंवि कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी  शिंदे यांच्या सूचना घेऊन तपास...
इमेज
प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; 6.15 लाखांचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ – बीड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 15 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला. ही कारवाई परळी तालुक्यातील नंदागौळ परिसरात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. तपासणी दरम्यान एका चारचाकी वाहनातून विविध कंपनीचा पानमसाला व गुटखा आढळून आला. ही उत्पादने महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असतानाही आरोपी ही वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव जाबाज खान समीर खान (वय 26, रा. मलिकपुरा, परळी) असे आहे. यासोबतच दोन आरोपी हे फरार आहेत. फरार आरोपींमध्ये अरबाज बशीर शेख (रा. पेट मोहल्ला, परळी) व दुसऱ्या आरोपीचे संपूर्ण नाव अद्याप मिळालेले नाही. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 6,15,000 रुपये असून, यामध्ये गुटखा, पानमसाला व वापरलेले वाहन यांचा समावेश आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. रामचं...

श्रीकृष्ण जन्माख्यान व पवमान सूक्त अभिषेक

इमेज
  परळी : झुरळे गोपीनाथ मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन  परळी :श्रीकृष्ण जन्मानिमित्त येथील झुरळे गोपीनाथ मंदिरामध्ये १५ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता  ह.भ.प. वेदमूर्ती रवींद्र महाराज वेताळ यांच्या अमृततुल्यवाणी मधून भगवान श्रीकृष्ण जन्माख्यान व पवमान सूक्त अभिषेक होणार आहे रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. . 14 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजल्यापासून गोकुळाष्टमी निमित्त दर्शन सुरू होणार आहे व 15 ऑगस्ट रोजी  रात्री दहा ते साडेअकरा दरम्यान अभिषेक होणार आहे. साडेअकरा वाजता प्रवचन होणार आहे. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम होणार आहे तरी  सर्व भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा  असे आवाहन झुरळे गोपीनाथ मंदिराचे मुख्य पुजारी सौ वैशाली  बडवे ,अनिल बडवे ,स्वप्निल बडवे ऋग्वेद बडवे ,संजय बडवे यांनी केले आहे

9 महिला सरपंचांचा समावेश

इमेज
  महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 9 महिला सरपंचांचा समावेश नवी दिल्ली,13: राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15  सरपंचांचा समावेश असून यात 9 महिला सरपंच आहेत. 15 ऑगस्ट रोजी हे सर्व सरपंच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व  सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे. या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत. महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच खालीलप्र...
इमेज
  तेली समाजाच्या वतीने वैद्यनाथ बॅकचे चेअरमन विनोद सामत विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सत्कार  परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)          वैद्यनाथ बॅकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत बॅकेचे चेअरमन विनोद सामत व संपूर्ण संचालक मंडळ विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल येथील तेली समाजाच्या वतीने शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.                येथील दि वैद्यनाथ को ऑपरेटिव्ह बॅकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता.१२) झालेल्या मतमोजणी मध्ये मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन विनोद सामत व संपूर्ण संचालक मंडळ विक्रमी मतांनी विजयी झाले. याबदल तेली समाजाच्या वतीने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, कोलूघाणा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश लांडगे, श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवा लांडगे, शिवकुमार व्यवहारे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नांदेड विभाग उपाध्यक्ष प्रा प्रविण फुटके, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जि...