इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

काव्य महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात साजरा 

 अंबाजोगाई ( प्रतिनिधी )

  अंबाजोगाई येथील काव्य महिला महाविद्यालय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

     महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य करुणा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 ध्वजारोहण नंतर काव्य महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष जयंत करपे यांनी स्वतंत्र दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,प्राचार्य देशमुख यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान संदेश दिला.  

    यावेळी प्राचार्य करुणा देशमुख प्रा, शशिकांत रहाडे ,फॅशन डिझाईनच्या शीला होके मॅडम पूजा नरवडे मॅडम आदमाने मॅडम गायत्री लोहिया मानसी मुळे पल्लवी गायकवाड मॅडम स्नेहल शिंदे किर्तन मॅडम संगणक विभागाच्या प्रमुख ऋतुजा शिंदे मॅडम कॉलेजचे ग्रंथपाल शिवाजी जाचक सर हे उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या