
काव्य महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात साजरा अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई येथील काव्य महिला महाविद्यालय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य करुणा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण नंतर काव्य महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष जयंत करपे यांनी स्वतंत्र दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,प्राचार्य देशमुख यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान संदेश दिला. यावेळी प्राचार्य करुणा देशमुख प्रा, शशिकांत रहाडे ,फॅशन डिझाईनच्या शीला होके मॅडम पूजा नरवडे मॅडम आदमाने मॅडम गायत्री लोहिया मानसी मुळे पल्लवी गायकवाड मॅडम स्नेहल शिंदे किर्तन मॅडम संगणक विभागाच्या प्रमुख ऋतुजा शिंदे मॅडम कॉलेजचे ग्रंथपाल शिवाजी जाचक सर हे उपस्थित होते