मुंबई-गैरसोयीमुळं मराठा आंदोलक आक्रमक!

मनोज जरांगेंची पहिली मागणी पूर्ण; मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक या परिसरात दाखल झाले आहेत. या आंदोलनाची तीव्रता बघता राज्य सरकारनं जरांगेंची पहिली मागणी पूर्ण केली असून, मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचं जात प्रमाणपत्र, तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, तिची मुदत संपल्यानं, मुदतवाढ देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ती मागणी सरकारनं मान्य केली असून, समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. वंशावळ समितीचा ...