इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

महामार्गावर दुर्देवी आपघात....

नामलगाव फाटा येथे भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी



बीड, प्रतिनिधी...

बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी (30 ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

भरधाव वेगाने धावणाऱ्या कंटेनरने रस्त्यावरील सहा जणांना चिरडले. यात सहाही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील आकाश कोळसे, पवन जगताप, किशोर तौर, दिनेश पवार, अनिकेत शिंदे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अमोल नामदेव गर्जे, विशाल श्रीकिसन काकडे हे तरुण पेंडगावला दर्शनाला जात असताना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या