
ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध परळीत गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी... मराठा समाजाबद्दल जाती आधारित वक्तव्यामुळे आमचा अपमान व मानहानी झाली असुन याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार परळीतील मराठा समाज बांधवांनी पोलीस स्टेशनला एका निवेदनाद्वारे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश घेऊन परळी पोलिसांनी या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला केला आहे.याबाबत देवराव लुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत हाके हे भाषणामध्ये मराठा समाजाला उद्देशुन म्हणाले की, तुम्ही आता ओबीसी मध्ये आलात, आता पहीले 11 विवाह आपल्या आपल्या मध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आल्याने जात पात राहीली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहीलात का? तसेच त्याच व्हीड...