
आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी बोधेगाव येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व वचनपुर्ती सोहळा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-माऊली (तात्या) गडदे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जलजीवन मिशन योजना, जिल्हा परिषद शाळा इमारत व श्री हनुमान मंदिर सभागृह यासह विविध विकास कामांचा लोकार्पन व वचनपुर्ती सोहळा राज्याचे माजी कृषिमंत्री मा.आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असुन यावेळी पंचक्रोशितील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली (तात्या) गडदे यांनी केले आहे. तालुक्यातील बोधेगांव येथे रविवार दि.19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता बोधेश्वर मंदिर येथे जलजीवन मिशन योजना, जिल्हा परिषद शाळेची 2 मजली इमारत ज्यात 7 रुम, बीड जिल्ह्यात टॉपवर असणारी डिजीटल अशी इमारत व श्री हनुमान मंदिर सभागृह यासह विविध विकास कामांचा लोकार्पन व वचनपुर्ती सोहळा मा.आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. माऊली (तात्या) गडदे यांच्या राजकीय आयुष्यातील 33 वर्षातील आनंदाचा हा क्षण असुन गेली 60 वर्षांपासुन मोडकळीस आलेल्या इमारतीचा नेत्र...