इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दुर्देवी घटना.....

अंत्यविधी दरम्यान पिकअप गर्दीत घुसला; एक ठार: दहा जण जखमी 

बीड जवळच्या पाली गावात घडलेली घटना

 बीड , एमबी न्यूज वृत्तसेवा: बीड जवळील पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव वेगाने येणारा पिकअप अंत्यविधी कार्यक्रमात घुसल्याने संभाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर असून सात ते आठ जण जखमी झाले आहे. यातील जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णाला उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली.


पाली परिसरातील स्मशान भूमीत स्वर्गीय आसराबाई किसनराव नवले यांचा अंत्यविधी सुरू होता. याच दरम्यान भरधाव वेगाने येणारा पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप अंत्यविधी मध्ये घुसला यात संभाजी विठ्ठलराव जाधव हे मयत झाले आणि इतर आठ ते दहा जण अपघातात जखमी आहेत. दरम्यान जखमीची संख्या वाढणार असल्याचे समजताच जिल्हा रुग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ अलर्ट करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या