इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा 


परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)

         येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ एन.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. 

           राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा डॉ राजकुमार यल्लावाड, ग्रंथपाल सिध्देश्वर कोकाट यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व स्पष्ट केले. डॉ राजकुमार यल्लावाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करावी. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ विद्या देशपांडे यांनी केला. विद्यार्थ्यांनी वाचनातून संशोधन पद्धती निर्माण करुन संशोधनाकडे वळले पाहिजे. यावेळी प्रा डॉ विना भांगे यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शपथ दिली व आभार प्रदर्शन केले. सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा प्रविण फुटके यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्रा प्रविण नव्हाडे, प्रा अशोक पवार, प्रा आशिलता शिंदेसह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या