पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
इमेज
डॉ.संपदा मुंडे हत्या प्रकरणी  उच्च न्यायालयाचा न्यायाधीशांची नेमणूक करून सखोल चौकशी करून न्याय द्या - वसंत मुंडे    परळी वैजनाथ (प्रतिनिधी) डॉ संपदा मुंडे यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात खळबळ माजली असून यास राजकीय नेते व प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. प्रशासनामार्फत वेगवेगळ्या समित्या चौकशी करिता नेमल्या जातात पण त्यात राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप असल्यामुळे त्यांच्या कडून निपक्ष पणे संबंधित घटनेच्या मुद्देनिहा चौकशी केली जात नाही. स्वतः मुख्यमंत्री फलटलांना जाऊन भाजपच्या राजकीय नेत्यांना चौकशी न करता अभय देतात.डॉ संपदा मुंडे ह्या गरीब शेतकरी कुटुंबातल्या असून मौजे कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील रोजंदारी करणारे कुटुंब आहे. त्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात संकट कोसळले असून यामध्ये जबाबदारी राजकीय नेते व प्रशासकीय यंत्रणेमार्फत दबावापोटी हॉटेल मधुदिप आत्महत्या केली नसून हत्या करण्यात आली आहे. या हातेश जबाबदार भाजपचे माजी खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर त्...

“पप्पू पास हो गया, पप्पू मेरीट आ गया!”

इमेज
  परळी संचार” दिवाळी अंकाचे आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून तोंडभरून कौतुक संस्कृती, अध्यात्म आणि परळीचे सामाजिक प्रतिबिंब उजळवणारा अंक परळी (प्रतिनिधी) : परळी शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या ‘परळी संचार’ या सर्वांगसुंदर दिवाळी अंकाचे आमदार धनंजय मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केले. “हा अंक केवळ दिवाळी अंक नसून परळीच्या सांस्कृतिक समृद्धीचा दस्तऐवज आहे,” अशा शब्दांत त्यांनी संपादक अनंत कुलकर्णी यांच्या प्रयत्नांचे मनापासून अभिनंदन केले. सुंदर मुखपृष्ठ, आकर्षक मांडणी आणि विषयानुरूप अभ्यासपूर्ण लेख यामुळे ‘परळी संचार’ दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे. संस्कृत पंडिता डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या कर्तृत्वावर आधारित लेखाने या अंकाची शैक्षणिक उंची वाढवली असल्याचे मुंडे यांनी नमूद केले. “पप्पू पास हो गया, पप्पू मेरीट आ गया!” या विनोदी परंतु कौतुकपूर्ण शैलीत त्यांनी संपादकांच्या धडपडीचा गौरव केला. अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे येत समाजातील सर्व घटकांशी सुसंवाद ठेवून अनंत कुलकर्णी यांनी हा अंक साकारला आहे. अनेक सहकाऱ्यांच्या सहयोगातून साकारलेल्या या अंकाने परळ...

जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे यश अभिमानास्पद

इमेज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड जिल्ह्याच्या भूमीपुत्रांचे दैदीप्यमान यश ; ना.पंकजा मुंडेंनी केले सर्वांचे अभिनंदन जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे यश अभिमानास्पद बीड।दिनांक ०१। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे अशा शब्दांत त्यांनी यशस्वीतांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र शैलेश भिकाराम आंधळे (Rank 04), प्रकाशकुमार महादेव बडे (Rank14), राहुल शिवाजी तांबे (Rank 26), लक्ष्मण दिनकर गुट्टे (Rank 56), अजितसिंह मधुकर शिंदे (Rank 58), रामदास नामदेव चोले (rank90), तेजस भीमाशंकर होनराव(rank98), नितीन भोलाजी खेंगरे (Rank 139), श्रीकांत दत्तात्रय होरमाळे (Rank140). या सर्वांनी दैदिप्यमान यश संपादित करत  घवघवीत यश मिळवले आहे. राज्यपातळीवर आपल्या जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. पुढील क...

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
  परळीच्या भूमिपुत्राचा प्रशासनात बहुमान: कोकण म्हाडाच्या मुख्य अधिकारी पदी डॉ. विशाल राठोड यांची नियुक्ती मुंबई, प्रतिनिधी...          प्रशासकीय क्षेत्रामध्ये परळीच्या भूमिपुत्राने विविध मुख्य पदांवर कर्तव्य बजावण्याचा बहुमान मिळवला असून परळीचे डॉ. विशाल राठोड यांची आता तीन वर्षासाठी कोकण विभागाच्या म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी\ प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विशाल राठोड यांच्यावर  कोकण विभागाच्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची मुख्य जबाबदारी घेण्यात आली आहे. परळीसाठी ही बहुमानाची बाब असून या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.            डॉ. विशाल राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुख्य अधिकारी, कोकण गृहनिमर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई या पदावर  ३ वर्षाकरीता नियुक्ती करण्यात येत आहे.याबाबतचा शासनादेश आज निर्गमित करण्यात आला आहे.परळीचे भूम...
इमेज
  महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण पळवले  परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील स्वाती नगर भागातील ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि.२२ ऑक्टोबर रोजी घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील स्वाती नगर भागातील रहिवासी प्रतिभा प्रमोद बावरे वय ५२ वर्षे या दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घराबाहेर पडल्या असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ५ ग्रॅम किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण ओरबडुन नेले.याप्रकरणी सदरील महिलेच्या फिर्यादीवरून दि.३० ऑक्टोबर रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि.राठोड हे करत आहेत.

श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेचा आज भव्य समारोप; भाविकांची मोठी गर्दी

इमेज
  श्रीराधा ही एक महान भावना आहे जी प्रत्येकामध्ये प्रकट होण्याची वाट पाहत आहे – साध्वी अदिती भारती देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या विवाह सोहळ्यात भाविक आनंदित श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेचा आज भव्य समारोप; भाविकांची मोठी गर्दी अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई येथे दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे सुरू असलेल्या श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथेचा आज भक्तीमय वातावरणात समारोप झाला. सहाव्या दिवसाच्या कथेदरम्यान कथाव्यास साध्वी अदिती भारतीजींनी गोदा देवीच्या जीवनकथेद्वारे देवी राधेचा गौरव केला आणि भाविकांना राधाभावाचे दिव्य दर्शन घडवले. साध्वीजींनी दुर्वासा ऋषींच्या शापामुळे इंद्रदेवाची संपत्ती हरपणे, स्वर्गातून देवी लक्ष्मीचे अदृष्य होणे आणि समुद्रमंथनातून देवी सुरभी व देवी महालक्ष्मी यांचे प्रकट होणे या अध्यात्मपूर्ण कथा रसाळ शैलीत सांगितल्या. त्यांनी श्री राधेचा महिमा वर्णन करताना सांगितले की,“श्री राधा ही श्रीकृष्णाची आह्लादिनी शक्ती आहे. त्या केवळ एका युगापुरत्या नसून प्रत्येक भक्तामध्ये प्रकट होण्याची वाट पाहत असलेली एक महान भावना आहेत.” मंगळवेढ्याच्या संतकन...
इमेज
  ढोंगाचे  साम्राज्य संपवण्यासाठी, प्रत्येक जीवात शिव आणि शक्तीचे मिलन आवश्यक आहे-साध्वी आदिती भारतीजी दिव्य ज्योति जाग्रति संस्थेतर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद् देवी भागवत कथेला भाविकांची अलोट गर्दी अंबाजोगाई/प्रतिनिधी   अंबाजोगाई येथे दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या संतुलन (महिला सशक्तीकरण व लिंग समानता) प्रकल्पांतर्गत दिव्य ज्योति  परिवार अंबाजोगाई च्या वतीने आयोजित  श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथेच्या पाचव्या दिवशी कथेला सुरुवात करत असताना दिव्यगुरू आशुतोष महाराज जी यांच्या शिष्या कथा व्यास साध्वी सुश्री आदिती भारती जी यांनी महर्षी व्यासांनी राजा जन्मेजयाला सांगितलेली भारत वर्षातील अयोध्यापती सम्राट सत्वशील राजा हरिश्चंद्र यांची जीवनगाथा सांगून आज कालच्या उदारतेचे ढोंग करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले.   पुढे शक्तीपीठाचा महिमा, माता पार्वतीचा जन्म , शिवपर्व , तपश्चर्या याविषयी सविस्तर माहिती सांगितली. कुमार कार्तिकेय यांनी केलेल्या तारकासुराच्या वधाचे सचित्र वर्णन केले. शक्तिपीठाचा अद्वितीय महिमा सांगताना साध्वीजी म्हण...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!