युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे यश अभिमानास्पद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड जिल्ह्याच्या भूमीपुत्रांचे दैदीप्यमान यश ; ना.पंकजा मुंडेंनी केले सर्वांचे अभिनंदन



जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे यश अभिमानास्पद


बीड।दिनांक ०१।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे अशा शब्दांत त्यांनी यशस्वीतांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र शैलेश भिकाराम आंधळे (Rank 04), प्रकाशकुमार महादेव बडे (Rank14), राहुल शिवाजी तांबे (Rank 26), लक्ष्मण दिनकर गुट्टे (Rank 56), अजितसिंह मधुकर शिंदे (Rank 58), रामदास नामदेव चोले (rank90), तेजस भीमाशंकर होनराव(rank98), नितीन भोलाजी खेंगरे (Rank 139), श्रीकांत दत्तात्रय होरमाळे (Rank140). या सर्वांनी दैदिप्यमान यश संपादित करत  घवघवीत यश मिळवले आहे.

राज्यपातळीवर आपल्या जिल्ह्याची मान उंचावणारे तुमचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. पुढील काळात राज्यातील सर्वसामान्य नागरीकांची सेवा तुमच्या हातून घडणार आहे. सामान्यांच्या समस्या आणि सेवेला प्राथमिकता देऊन आपण राष्ट्रनिर्मितीत भरीव योगदान द्याल हा विश्वास आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी कौतुक केले आहे.
•••• 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या