इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

हार्दिक अभिनंदन!!!!

 परळीच्या भूमिपुत्राचा प्रशासनात बहुमान: कोकण म्हाडाच्या मुख्य अधिकारी पदी डॉ. विशाल राठोड यांची नियुक्ती




मुंबई, प्रतिनिधी...

         प्रशासकीय क्षेत्रामध्ये परळीच्या भूमिपुत्राने विविध मुख्य पदांवर कर्तव्य बजावण्याचा बहुमान मिळवला असून परळीचे डॉ. विशाल राठोड यांची आता तीन वर्षासाठी कोकण विभागाच्या म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी\ प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विशाल राठोड यांच्यावर  कोकण विभागाच्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची मुख्य जबाबदारी घेण्यात आली आहे. परळीसाठी ही बहुमानाची बाब असून या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

           डॉ. विशाल राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुख्य अधिकारी, कोकण गृहनिमर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई या पदावर  ३ वर्षाकरीता नियुक्ती करण्यात येत आहे.याबाबतचा शासनादेश आज निर्गमित करण्यात आला आहे.परळीचे भूमिपुत्र असलेल्या डॉ. विशाल राठोड यांनी प्रशासनात विविध पदांवर चांगले काम केले आहे. आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा त्यांनी प्रशासनात उमटवलेला आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी /प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने आता त्यांना तीन वर्षासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणा अंतर्गत कोकण म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या