परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
डॉ.संपदा मुंडे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाचा न्यायाधीशांची नेमणूक करून सखोल चौकशी करून न्याय द्या - वसंत मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) डॉ संपदा मुंडे यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात खळबळ माजली असून यास राजकीय नेते व प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. प्रशासनामार्फत वेगवेगळ्या समित्या चौकशी करिता नेमल्या जातात पण त्यात राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप असल्यामुळे त्यांच्या कडून निपक्ष पणे संबंधित घटनेच्या मुद्देनिहा चौकशी केली जात नाही. स्वतः मुख्यमंत्री फलटलांना जाऊन भाजपच्या राजकीय नेत्यांना चौकशी न करता अभय देतात.डॉ संपदा मुंडे ह्या गरीब शेतकरी कुटुंबातल्या असून मौजे कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील रोजंदारी करणारे कुटुंब आहे. त्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात संकट कोसळले असून यामध्ये जबाबदारी राजकीय नेते व प्रशासकीय यंत्रणेमार्फत दबावापोटी हॉटेल मधुदिप आत्महत्या केली नसून हत्या करण्यात आली आहे. या हातेश जबाबदार भाजपचे माजी खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर त्यांचे दोन पी ए, पीएसआय गोपाळ बदने घरमालक बनकर तसेच हॉटेलमध्ये संचालक दिलीप सिंह भोसले व त्यांचे कर्मचारी यांची संपूर्ण मुद्देनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यांचे मोबाईल जप्त करून कॉल रेकॉर्डिंग तपासावेत अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली. दवाखान्यात सेवेसाठी रात्री बेरात्री शवच्छेदानासाठी डॉक्टर मुंडे ला बोलावून घेऊन महिला असूनही त्रास दिला जात होता. भाऊबीजच्या दिवशी दिवाळी असतानाही २३ सप्टेंबर २०२६ ला तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली नसून हत्या करण्यात आली आहे ,यास सर्वशी राजकीय नेते व प्रशासन जबाबदार असून मेडिकल रिपोर्ट फिट प्रमाणपत्र बदलून देण्यासाठी मोठे शेडयंत्र रचून लैंगिक शारीरिक छळ मानसिक त्रास दिलेल्या असल्यामुळे मा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा मार्फत संपूर्ण प्रकरणाची निपक्ष पद्धतीने तपासणी मुद्देनिहाय करून कायदेशीर गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा