पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
इमेज
  पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहात पकडला; एसीबीची कारवाई गेवराई | प्रतिनिधी कुठलेही टेंडर नसताना खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असतानाच, वाळूमाफियांकडून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय आघाव यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी वाळू माफियाला सहकार्य करण्यासाठी हवालदार आघाव यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती २० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. याबाबतची माहिती बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच, उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि हवालदार आघाव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित घटनेबाबत पुढील तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील 250 आशांचा सहभाग

इमेज
  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU च्या अधिवेशनाची रॅली व सभेने सुरुवात दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील 250 आशांचा सहभाग  परळी वै. दि. 8 प्रतिनिधी....         आशांना शासकिय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मिळाले पाहिजेत यासाठी आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU सतत लढे आंदोलन करीत आहे. मागणी मान्य होई पर्यंत लढा चालु ठेवण्याचा निर्धार CITU चे राज्य महासचिव कॉ एच एम शेख यांनी केला आहे. शनिवारी दि 8 रोजी परळी येथील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.       महाराष्ट्र आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU चे 4 अधिवेशन परळी येथील प्रवचन सभामंडपात झाली. शनिवारी दि 8 रोजी सकाळी दहा वाजता प्रवचन सभामंडप येथुन आशा स्वंसेवीका ची रॅली काढण्यात आली. रॅली मधील आशांच्या हातात लालबावटयाचा झेंडा व मागण्यांच्या गगणभेदी घोषणानी परिसर दणाणून गेला होता. रॅली चा समारोप मोंढा मैदानावरील जाहीर सभेने झाला. यावेळी बोलताना कॉ एच एम शेख यांनी आरोग्य विभागातील महत्वाचा दुवा म्हणुन आशा स्वंसेवीका काम करीत आहेत. कोरोना सारख्या महामारीत प्रत्येक घरोघरी जाण्याचे काम आशांनी...

दुःखद वार्ता : भावपुर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
  राजेंद्र ओझा यांच्या भगिनी श्रीमती चंद्रकलाबाई ओझा यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र ओझा यांच्या भगिनी श्रीमती चंद्रकलाबाई ओझा यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 87 वर्षे होते.       श्रीमती चंद्रकलाबाई ओझा या धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. मारवाडी समाजात त्यांना अतिशय मानाचे स्थान होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यातच आज शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कै. चंद्रकलाबाई ओझा यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता परळी येथील राजस्थानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.       कै. चंद्रकलाबाई ओझा यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, दोन भावजई, पुतण्या असा परिवार आहे. वैद्यनाथ बँकेचे कर्मचारी योगेश ओझा यांच्या त्या आत्या होत. ओझा पारावरच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश

इमेज
  मनोज जरांगे प्रकरणी ना. पंकजा मुंडे यांची जालन्याच्या एसपींशी चर्चा ;  प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश मुंबई।दिनांक ०६। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या माध्यमात आल्यानंतर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना संपर्क साधून या विषयावर चर्चा केली.  या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करावी असे आदेश आज दिले.    मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात  आल्यानंतर जालना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच जालन्याच्या पालकमंत्री म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांनी लगेचच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना फोनवरून संपर्क साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. हा प्रकार अतिशय गंभीर असून याचा सखोल तपास करावा तसेच जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करावी असे आदेश त्यांनी पो...

शनिवारी मोंढा मैदानावर होणार जाहीर सभा

इमेज
  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) च्या अधिवेशनाची परळीत जय्यत तयारी  शनिवारी मोंढा मैदानावर होणार जाहीर सभा परळी वै. या.6 प्रतिनिधी           महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्य अधिवेशन दि.8 व 9 नोव्हेंबर रोजी परळीत होणार आहे. पहिल्या दिवशी शनिवार दि. 8 रोजी परळी शहरात आशा व गटप्रवर्तकांची भव्य रॅली काढून मोंढ्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्हा आशा वर्कर्स फेडरेशन च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्यस्तरीय अधिवेशन ८ व ९ नोव्हेंबरला परळी येथील वैजनाथ मंदिर परिसरातील प्रवचन सभामंडपात होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात जन सुरक्षा विधेयक रद्द करा, चार कामगार संहिता आणि 12 तासांचा कामाचा दिवस रद्द करा, सार्वजनिक आरोग्याचे खाजगीकरण थांबवा आणि आरोग्याच्या बजेट मध्ये वाढ करा, आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, योजना कर्मचाऱ्यांची एकजूट कायम करा, आदी मागण्यांचे ठराव पारित करण्यात येणार आहेत. ...

फसवणूक करून अनेक महिन्यांपासून फरार असलेला सोनार पुण्यातून पकडला

इमेज
  गोल्ड लोन साठी सोने तपासून देणाऱ्या सोनारानेच केली बँकांची फसवणूक फसवणूक करून अनेक महिन्यांपासून फरार असलेला सोनार पुण्यातून पकडला बीड: सोन्यावर कर्ज ही स्कीम सर्व बँका आणि सर्व प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांमध्ये चालू आहे. परंतु हा सोने तपासून देणाराच जर लफंगा असला तर बँक बुडालीच म्हणून समजा. बीड येथील अशाच एका सोनाराने स्वतः ग्राहक कर्ज घेण्यासाठी तयार केले. कर्जासाठी त्यांची निवेदन बँकेस पाठवली आणि त्यांना बनावट सोने तयार करून दिलं. अशा प्रकारे तयार केलेले सोने बँकेला तपासून देताना ते खरे आहे असे भासवले. बँकेने आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि लोकांना भरमसाठ कर्ज वाटप केले. असे बनावट १६ ग्राहक बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये या सोनाराने पाठवले आहेत. संशयिताचे नाव विलास उदावंत, राहणार पंडित नगर, नगर रोड, बीड, जो ‘विलास ज्वेलर्स’ नावाने बीड येथे दुकान चालवायचा. जलद श्रीमंत व्हायचे म्हणून त्याने हा उद्योग चालू केला आणि सामान्य लोकांकडूनही “सोने गहाण ठेवा, पुढच्या महिन्यात तुम्हाला जास्त सोनं देतो, पैसे जमा करा, त्या बदल्यात जास्त सोनं देतो” असे खोटे आश्वासन देऊन दोन महिन्यात सर्व मिळून अडी...

कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय?

इमेज
  सेवा परमो धर्मः हे ब्रीद पाळत डॉ. संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातून आठ लाख रुपयांची कॉकलियर इंप्लांट सर्जरी मोफत चिमकुल्या मूकबधिर मंगेशला ऐकता व बोलता येऊ लागले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मंगेश चंद्रकांत लव्हारे रा. पट्टी वडगांव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड हा दोन वर्षाचा छोटा बाळ जन्मतः मूकबधिर होता. त्याच्या पालकांनी माझ्याकडे उपचारांसाठी संपर्क केला. त्यानंतर त्याचे योग्य निदान करून के इ एम रुग्णालयात डॉ. हेतल पटेल यांच्याकडे पाठवले. तिथे चिमुकल्या मंगेशची कॉकलियर इंप्लांट सर्जरी केली. त्याचा खर्च तब्बल 8 लाख रुपये होता. त्यामुळे विविध एन जी ओ मार्फत निधी उपलब्ध करून मंगेशची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यावर आता त्याला ऐकू व बोलता येऊ लागले. या पुण्यकर्मात योगदान देता आले हे मी माझे भाग्य समजतो. या आधी आजवर 70 ते 80 जणांवर हीच कॉकलियर इंप्लांट सर्जरीमध्ये योगदान देता आले याचा आनंद अवर्णनीय आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा परमो धर्मः हे ब्रीद पाळत मी आजवर काम करत आलो आहे व यापुढेही करत राहणार आहे. मी फक्त माझे कर्तव्य बजावत आहे अश...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!