पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

आज सायंकाळी वार्षिक स्नेहसंमेलन...

इमेज
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये सातव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन परळी (प्रतिनिधी)      शालेय कामकाजातील सर्वात महत्त्वाचा व जल्लोषाचा दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,यासाठी आज सातव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी विविध संकल्पनेवर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी 'वर्ल्ड ऑफ इमोशन 'या संकल्पनेवर विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत.           यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नवनीत कांवत सर (पोलीस अधीक्षक, बीड),सन्माननीय अतिथी शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब (सचिव,त्रिपुरा सरकार),स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम, श्री.गणेश गिरी सर (गटशिक्षणाधिकारी) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या कार्यक्रमास 'मुरंबा' या मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बोरुले मॅडम यां...

लोकनेत्याचे घेतले आशिर्वाद......!!!

इमेज
  माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी गोपीनाथगडावर नतमस्तक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी गोपीनाथगडावर नतमस्तक होऊन लोकनेत्याचे आशीर्वाद घेतले.        लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज १२ डिसेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त गोपीनाथगडावर राज्यभरातून मोठ्या संख्येने जनसमुदायाने दर्शनाला रिघ लावली.या अनुषंगाने परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी परळी नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासमवेत पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.धर्माधिकारी दाम्पत्य  गोपीनाथगडावर नतमस्तक होऊन त्यांनी लोकनेत्याचे आशीर्वाद घेतले.

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!!!

इमेज
  श्रीनिवास राऊत यांना पितृशोक ; बबनराव राऊत यांचे अपघाती निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक नेते श्रीनिवास राऊत यांचे वडील बबनराव पिलोबा राऊत यांचे आज शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 53 वर्षे होते. उद्या शनिवारी सकाळी परळीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.      शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याचे सुमारास बबनराव राऊत हे एक लग्न आटोपून ऑटो रिक्षाने परळी वैजनाथकडे येत असताना निळा पाटीजवळ त्यांचा ऑटो अचानक पलटी झाला. यात बबनराव राऊत यांच्या छातीला जबर मार लागला. त्यांना प्रथम गंगाखेड येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. कै. बबनराव राऊत यांच्या पश्चात   पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.  आज परळीत अंत्यसंस्कार      कै. बबनराव राऊत यांच्या पार्थिवावर उद्या...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  लक्ष्मणराव घवाळकर यांना बंधू शोक ; रामराव विश्वनाथराव घवाळकर यांचे निधन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-येथील प्रसिद्ध मोटार तज्ञ लक्ष्मणराव घवाळकर यांचे बंधू व सध्या माजलगाव येथील रहिवासी रामराव घवाळकर यांचे मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्षे होते.                                                       येथील पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून सेवा बजावली होती व सध्या ते सेवानिवृत्तीचे जीवन जगत होते. अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून त्यांची ख्याती होती.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथील कोकिळाबेनस इस्पितळात गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते त्यांच्या पश्च्यात पत्नी, चार भाऊ, सहा बहिणी,तीन मुले, सुना व नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.  त्यांच्या निधनाबद्दल परळी व माजलगाव भागामध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा विद्यान...

ना.पंकजाताई मुंडेंनी अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन

इमेज
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील ऋषीतुल्य व सात्विक नेता हरवला ! ना.पंकजाताई मुंडेंनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन लातूर, प्रतिनिधी....... माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता हरवला असल्याचे शोकसंवेदना ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.     राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता आज हरवला आहे.शिवराज पाटील चाकूरकर हे  आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. देश पातळीपर्यंत अत्यंत सन्मानाने आणि ...

ना.पंकजाताई, डॉ.प्रितमताई, आ.धनंजय मुंडेंसह राज्यभरातील हजारो कार्यकर्ते समाधीसमोर नतमस्तक

इमेज
  गोपीनाथगडाची निर्मिती वंचित, उपेक्षितांसाठीच; त्यांच्याच आदर्शावर माझी वाटचाल - ना.पंकजा मुंडे लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथगडावर उसळली अलोट गर्दी रक्तदान शिबीर, गरजुंना मदत, अन्नदानासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन परळी वैजनाथ।दिनांक १२। गोपीनाथगडाची उभारणी हीच मुळात लोकनेते मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला नतमस्तक होता यावे, त्यांचे सुख-दु:ख त्याला मस्तक टेकून सांगता यावे यासाठी केलेली आहे. पृथ्वीतलावरील एकमेव असा हा गड आहे जो एका लेकीने आपल्या वडीलांच्या स्मृतीनिमित्त उभा केला आहे. वास्तविक पाहता हा गड मी उभा केलेला नाही तर ईश्वरानेच हे घडवून आणलेले आहे. मुंडे साहेबांनी  आयुष्यातला क्षण न् क्षण वंचित, पिडीतांसाठी वेचला आहे, त्यांच्याच आदर्शावर माझी वाटचाल आहे अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.           लोकनेते मुंडे साहेब यांची जयंती आज गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी  संवाद साधताना त्या बोलत होत्या. प्...

Pankaja Munde:तेंव्हा ते म्हणाले,"बेटा तुला खूप त्रास झाला का?"

इमेज
गोपीनाथराव मुंडे एक हळवा बाप :पंकजा मुंडे यांनी स्वतः सांगितला 'तो नाजूक क्षणातील' किस्सा ! लेक अन् आठणी: नेता आणि पिता यादृष्टीने पंकजांनी केलं मनमोकळ भाष्य परळी वैजनाथ, प्रतिनिधी......      राजकीय क्षेत्रात गोपीनाथराव मुंडे हे नाव एका उंचीवर गेलेलं नाव म्हणून देशभर ओळखलं जातं. मात्र ते किती हळव्या मनाचे आणि संवेदनशील वडील होते याचा एक किस्सा त्यांच्या कन्या व राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी सांगितला. हा किस्सा सांगताना पंकजा मुंडे एक लेक म्हणून काहीशा भावनिकही झाल्याचे बघायला मिळाले.         भाजपाचे दिवंगत केंद्रीय मंत्री लोकनेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे गोपीनाथराव मुंडे यांची आज 12 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने आपल्या वडिलांच्या दुर्मिळ आठवणी सांगताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे काहीशा भाऊक झाल्या होत्या. एक खंबीर धीरोदात्त नेता अशी ज्यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे. असे गोपीनाथ मुंडे हे लेकीसाठी किती हळवे आणि संवेदनशील होते याचा एका नाज...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!